मुख्य बातम्या

नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात; शरद पवारांनी साधला निशाणा

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात. त्यांच्या शिस्तीची खासदारांना धास्ती असते.असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

भाजप खासदारांच्या संसदेतील उपस्थितीची हजेरी दर दोन तासांनी घेतली जाते. ही यादी `वर’ ज्यांच्याकडे पोचवायची तिकडे पोचवली जाते. मग गैरहजर राहणाऱ्या खासदारांना बोलवून सांगितले जाते, की पुढच्या वेळी तुला तिकीट नाही. त्यामुळे भाजप खासदार शाळेतल्या मुलांसारखे संसदेच्या सभागृहात बसून राहतात, असं ते म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणी चेहरा नाही, नेतृत्व नाही, अशी चर्चा केली जाते. परंतु 1977 मध्ये अशीच स्थिती होती, असंही त्यांनी सांगितलं.

Most Popular

To Top