पुणे – ९ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याचा इशारा मराठा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. त्याबद्दल मराठा क्रांती मोर्च्याकडून निवेदन सादर करण्यात आलं आहे. नेमकं ९ ऑगस्टला आंदोलनाची दिशा काय असणार आहे.याबाबत निवेदनात सांगण्यात आलं आहे.
सकाळी ९ वाजल्यापासून ते सांयकाळी ५ यावेळेत आंदोलन करण्यात येणार आहे. या दरम्यान गावा शेजारील रोड, हायवे मोर्चेकऱ्यांनी जाम करायचे आहेत. गाड्या, गुरंढोरं, ट्रँक्टर, छोटे मोठे वाहने घेऊन रस्त्ये अडवावेत. तसंच सरकारी मालमत्तेच नुकसान करू नये.
जर सरकारने आंदोलनाचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील असा इशाराही देण्यात आला आहे.