कोल्हापूर– पोलिसांनाही ९ ऑगस्टच्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची भीती वाटतेय. असं मत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी व्यक्त केलं. ते कोल्हापूरात मराठा समन्वयांच्या बैठकीत बोलत होते.
पूर्वीचे मोर्चे मुक होते. त्यामुळे चिंता नव्हती. आता ठोक मोर्चे निघत आहेत. आणि २० ते २५ वयोगटातील तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांना आवरण्यासाठी खबरदारी घ्यायला हवी, असंही ते म्हणाले.
९ ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मोर्चेकऱ्यांकडून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ते मुळे कुठंही हिंसक प्रकार घडू नये. यासाठी नियोजन बैठकीत ते बोलत होते.