नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी कॉग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. बी. के हरिप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
९ ऑगस्टला राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. याबाबत व्यंकय्या नायडूंनी घोषणा केली होती. त्यासाठी विरोधक तयारीला लागले होते.
विरोधकांकडून राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी देण्याचं बोललं जात होतं. मात्र कॉग्रेसने आपला उमेदवार दिला आहे.