मुख्य बातम्या

पवारांच्या अगोदर नितीश कुमारांनी फोन केला अन पटनाईकांना पटवलं

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवार देण्यासाठी सर्व पक्षीयांनी जोरदार कंबर कसली आहे. राष्ट्रवादीकडून खासदार वंदना चव्हाण यांना उमेदवारी देण्याचं बोललं जात होतं.

बिजू जनता दलाने (बीजेडी) सत्तारूढ आघाडी पुरस्कृत संयुक्त जनता दलाचे उमेदवार हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी रात्री बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना फोन करून हरिवंश यांना मतदान करण्याची विनंती केली. हरिवंश हे नितीशकुमार यांच्या पक्षाचे सदस्य आहेत. पटनाईक यांनी त्यास होकार दिल्याचे समजते.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पटनाईक यांचे निकटचे संबंध लक्षात घेता पवार बिजेडीची मतेही मिळवू शकतील असे मानले जात होते; परंतु नितीशकुमार यांनी आधीच पटनाईक यांना पटविल्याने विरोधी पक्षांच्या गळाला पटनाईक लागू शकले नाहीत.

Most Popular

To Top