पुणे – माझी बायको अमृताचं नाव नाही घेतलं तर मला जेवण मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुण्यात वॉटरकप स्पर्धेच्या निकालावेळी बोलत होते.
फडणविसांनी भाषणाला सुरवात केल्यानंतर सगळ्या उपस्थित मान्यवरांची नाव घेत असताना पत्नी अमृता फडणवीस यांचंही नाव घेतलं, आणि म्हणाले जर तीचं नाव घेतलं नाही तर मला जेवण मिळणार नाही, असं ते म्हणतात उपस्थितांमध्ये हशा पिकला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आमिर खान आणि पानी फाऊंडेशनचं कौतुक केलं. गावं अजून पाणीदार बनवण्यासाठी सरकार सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी दिली.या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची आणि राजकारणी मंडळींनी हजेरी लावली होती.
