मुंबई – कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. तसंच लाल किल्ल्यावरील नरेंद्र मोदीचं हे शेवटचं भाषण असणार आहे, कारण पुढचा पंतप्रधान आमचाच असणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.ते मुंबईत कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधानांनी खोटं बोलायचं थाबंवाव, त्याचं आजचं लाल किल्ल्यावरील भाषण हे प्रचाराचं भाषण होतं, मोदींनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल बोलावं, असं ते म्हणाले.
तसंच भाईंदर येथे काही जणांकडे बॉम्ब सापडले आहेत. मात्र सरकारकडून त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, तसंच सनातन संस्थेवर का बंदी घातली जात नाही, असा सवालही त्यांनी केला.