पुणे – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालं. त्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. तसंच अटलजींच्या आणि त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
मी कॉंग्रेसचा संसदीय नेता होते. या नात्याने वाजपेयी यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मी केलेले भाषण त्यांनी शांततण ऐकून घेतले. त्यानंतर वाजपेयी यांनी राजीनामा दिला. त्या रात्री त्यांचा मला फोन आला व संसदेत केलेल्या भाषणाबद्दल त्यांनी माझे कौतुक केले. अशाप्रकारे राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक उमदा माणूस मी पाहिला, असं पवारांनी म्हटलं आहे.
गुजरातमध्ये २००२ मध्ये भूकंप आला होता. त्यात मोठी हानी झाली होती. भूकंप झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या पुनर्वसनाचा मला अनुभव होता. मी स्वतः वाजपेयी यांनी गुजरातला याबाबत सहकार्य करण्याची तयारी असल्याचे कळवले. त्यानंतर त्यांच्याच सरकारच्या काळात आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करून त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. विरोधी पक्षांच्या चांगल्या सूचनांचाही ते नेहमी आदर करायचे, असा अनुभव पवार यांनी सांगितला.
