मुंबई – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो, असं माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सांगितलं. वाजपेयींचं आज निधन झालं त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे दोन्ही नेते भिन्न स्वभावाचे होते. या दोघांमध्ये हजरजवाबीपणा होता असे स्पष्ट करतानाच मी 1995 जेव्हा मुख्यमंत्री झालो त्याचे श्रेय वाजपेयींनाही जाते अशी कबुली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आज दिली.
शिवसेना आणि भाजपची पंचवीस वर्षाहून अधिक काळ युती टिकली ती वाजपेयी आणि बाळासाहेबांमुळे. हे दोन्ही नेते भिन्न स्वभावाचे होते. पण, युतीमध्ये कधी टोकाचे मतभेद बनले नाहीत.