मुख्य बातम्या

खड्ड्यांवरून धनजंय मुंडेंचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल!

बीड– रस्त्यातील खड्ड्यांवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महसुलमंत्री चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे.  रस्ते दुरुस्तीवर मागील 4 वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रु नेमके कोणाच्या खिशात गेले ? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सेल्फी विथ खड्डा आंदोलन केलं जातंय. त्यामुळे धनंजय मुंडेंनी, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील ,गंगाखेड -परभणी रस्त्यावरील हे पहा खड्डे. सरकारच्या नाकर्तेपणा मुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ दखल घ्यावी. रस्ते दुरुस्तीवर मागील 4 वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रु नेमके कोणाच्या खिशात गेले ? अशा आशयाची त्यांनी फेसबुक पोस्ट टाकली असून सेल्फी सोबत खड्ड्यांचे फोटो टाकले आहेत.

दरम्यान, रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत. वाहतुकीची कोंडी होत आहे. तसंच रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनात वाढ होत आहे. त्यामुळे सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने हा उपक्रम राबवला जात आहे.

Most Popular

To Top