मुख्य बातम्या

राष्ट्रवादीची नवी मोहीम; “56 इंचाच्या छातीवाल्यांना 56 प्रश्न”

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात मोहिम सुरू केली आहे. 56 इंचाच्या छातीवाल्यांसाठी 56 प्रश्न या आशयाची मोहीम राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सरकारला जाब विचारण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

भाजपच्या आश्वासनाचा फुगा फुटलाय… जनतेच्या सहनशक्तीचा अंत होत चाललाय…वेळ आली आहे सरकारला जाब विचारण्याची.. त्यामुळे आपले प्रश्न #जवाबदो वापरून कमेंटमध्ये विचारा असं आवाहन करण्यात आलं आहे.

तसंच, प्रश्न तुमच्या, आमच्या मनात खदखदणारे, टोचणारे.. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून सरकारला जाब विचारा.. आणि मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हा. चला, “सरकारला उत्तरं देण्यास भाग पाडूया” असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, दुसरीकडे रस्त्यातील खड्ड्यांवरून राष्ट्रवादीने भाजपला धारेवर धरलं आहे. सेल्फी विथ खड्डा ही मोहीम राष्ट्रवादीने सुरू केलली आहे.

Most Popular

To Top