पुणे – दहिहंडीमध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी फटकारलं आहे. त्यांनी राम कदम यांचा निषेध केला आहे. त्यांनी व्हीडिओ शेयर करत याबाबत रोष व्यक्त केला आहे.
दहिहंडी उत्सवामध्ये राम कदम यांची जिभ घसरली. ते म्हणाले तुमचं काहीही काम असेल ते मी करणार.. कोणी प्रपोज केला त्याला पोरगी नाही म्हणाली त्याला ही मदत करणार.. मात्र त्याने पहिल्यांदा आई-बापाला माझ्याकडे घेऊन यायचं.. त्यांना मुलगी पसंत असली की, मी तीला पळवून आणून तुम्हाला देणार, असं ते म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्याचा सगळ्यात स्तरातून निषेध केला जातोय. मात्र राम कदम आपल्या वक्तव्यावर ठाम असून आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय, असं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्याम, राम कदमांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत असताना अशा वक्तव्यामुऴे त्याला प्रोत्साहन मिळतं, असंही त्या म्हणाल्या.
नावात राम पण वृत्ती मात्र विलासी @supriya_sule @Jayant_R_Patil @NCPspeaks @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @ANI pic.twitter.com/wrg8xytgrL
— Chitra Kishor Wagh (@chitrancp) September 4, 2018