मुख्य बातम्या

मी कोणाच्या दबावाला जुमानत नाही- एकनाथ खडसे

नाशिक – मी कोणाच्या राजकीय दबावाला जुमानत नाही, मला योग्य वाटतं तेच मी बोलतो, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

भाजपचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे येणार होते, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. त्यांनी या क्रार्यक्रमात व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, माझे आणि हिरे घराण्याचे वर्षानुवर्ष पासूनचे संबंध असून त्यांच्या सामाजिक सेवेच्या वैद्यकीय केंद्राच्या उदघाटनासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. तेथे मी जाण्याचे निश्‍चित केले आहे. पण औरंगाबाद उच्च न्यायालयात तारीख असल्याने जाता आले नाही. याचा कोणीही राजकीय विपर्यास करू नये.

तसंच, मी कोणाच्याही दबावाला जुमानत नाही, अपूर्व चा सामाजिक कार्यक्रम असल्याने तो निश्‍चितपणे कौतुकास्पदबाब असून यापुढील त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला निश्‍चितपणे उपस्थित राहील व त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या अनेक शुभेच्छा आहेत असे खडसे यांनी सांगितले.

Most Popular

To Top