मुख्य बातम्या

शेतकऱ्यांसाठी उपोषण करणाऱ्या गुजरातच्या वाघाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

गांधीनगर – शेतकऱ्यांसाठी पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेल गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. त्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

गेल्या 14 दिवसांपासून आपल्या राहत्या घरीच हार्दीक पटेल आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसला आहे. सध्या त्यांची प्रकृती बिघडली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे रूगण्यालयाच्या बाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हिंदीमध्ये ट्विट करत, किसानों की कर्जमाफी और आरक्षण की मांग को लेकर गुजरात का शेर हार्दिक पटेल १४ दिनों से अनशन कर रहा है। तबियत खराब होने के कारण उसे अस्पताल में भर्ती कर दिया गया है। सरकार ने इस जनआंदोलन को खत्म करने के लिए कोई कसर नहीं छोडी है। हार्दिक की मांगों का राष्ट्रवादी पूरा समर्थन करती हैं। असं म्हटलं आहे.

दरम्यान, त्यांच्या आंदोलनाला अनेक भाजप विरोधकांनी पाठिंबा दिला असून दिंवसेंदिवस हे आंदोलन अधिकच तिव्र होताना पाहायला भेटतंय.

 

Most Popular

To Top