मुख्य बातम्या

भाजप खासदाराचे पाय धुवून कार्यकर्त्ये प्यायले पाणी; पाहा व्हिडीओ

लखनऊ– भाजप खासदाराने जमतेची कामं करून देतो म्हटल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी खासदाराचे पाय धुवून पाणी प्यायल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील गोड्डा येथे घडली आहे.

उत्तर प्रदेशमधील गोड्डा येथील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ब्रीज बांधून दोन गावांना जोडण्याचे वचन पूर्ण केल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निशिकांत दुबे यांचे पाय धुतले आणि ते पाणी प्यायले.

या सर्व गोष्टींना दुबे यांनी मान्यता दिल्यामुळे एक नवा वाद समोर आला आहे. कार्यकर्त्याने दुबे यांचे पाय धुतलेले पाणी प्यायले तेव्हा निशिकांत यांनी अडवले नाही. उलट ही घटना त्यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केली. या व्हिडिओवरून वादाला तोंड फुटलेलं पाहिल्यावर दुबे म्हणाले की, ‘जर नागरिक त्यांचा आनंद पाय धुवून साजरा करत असतील तर त्यात काय वाईट आहे?’

 

Most Popular

To Top