महाराष्ट्र

मानाच्या पहिल्या गणपतीला सुप्रिया सुळेंनी घातलं ‘हे; साकडं!

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचं आज दर्शन घेतलं. यावेळी सुप्रिया सुळेंनी गणपतीचरणी प्रार्थना केली.

त्या म्हणाल्या, राज्यातील जनता सुखी व्हावी,शेतमालाला चांगला दर मिळावा,बेरोजगारांना रोजगार मिळावा, पेट्रोलचे दर सर्वसामान्याच्या आवाक्यात यावेत,राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पुनःप्रस्थापित व्हावी अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सांगीतलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 56 इंच छातीवाल्यांना 56 प्रश्न, जबाव दो, अशा प्रकाराची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामोहीमेला राज्यभरातून प्रंचंड प्रतिसाद मिळत असून, अनेक नागरिकांकडून सरकारला प्रश्न विचारले जात आहेत.

 

Most Popular

To Top