मुंबई– भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल वाढदिवस होता. या वाढदिवसानिमीत्त देशभरातून मोदींना अनेक शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपच्या अनेक नेत्यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त सामाजीक उपक्रम राबवले तर काहींनी सांस्कृतीक कार्यक्रम घेऊन मोदीच्या दिघार्युष्यासाठी प्रार्थना केल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या टवीटर हॅडलवरून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांनी मोदीसाठी लिहिलेल्या ओळीमुळे त्यांच्या या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, साथ आहे आणि विश्वासही नेतृत्त्व आहे आणि कर्तृत्त्वही सन्मान आहे आणि सार्थ अभिमानही नेता ऐसा मिळावा हे आपुले भाग्यही नवभारताच्या निर्मितीसाठी अविरत कार्यरत,भारताचे शक्तिशाली नेतृत्त्व, लाडके पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवशी महाराष्ट्राच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा, असं लिहीलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांसाठी मोदी हे लाडके पंतप्रधान आहेत. त्यामुळे अनेकांनी सोशलमिडीयावरून मुख्यमंत्र्यांना ट्रोल केलं आहे.
साथ आहे आणि विश्वासही
नेतृत्त्व आहे आणि कर्तृत्त्वही
सन्मान आहे आणि सार्थ अभिमानही
नेता ऐसा मिळावा हे आपुले भाग्यहीनवभारताच्या निर्मितीसाठी अविरत कार्यरत,भारताचे शक्तिशाली नेतृत्त्व, लाडके पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवशी महाराष्ट्राच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा pic.twitter.com/6DI8g6zFaA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2018