महाराष्ट्र

…तर तशी फसवणूक काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाआघाडीमध्ये होऊ नये- राजू शेट्टी

कोल्हापूर– शेतकऱ्यांची फसवणुक केली म्हणून आम्ही लोकशाही आघाडीतून म्हणजेच एनडीएतून बाहेर पडलो, आता तशीच फसवणूक काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीमध्ये होऊ नये, असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.

की शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना न्याय मिळेल, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी अंमलात आणल्या जातील, शेतकऱ्याच्या उत्पादनाला हमी भाव मिळेल अशा मोठ्या अपेक्षा घेवून आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो. मात्र आमच्या अपेक्षा फोल ठरल्या. म्हणूनच यातून आम्ही बाहेर पडलो आहोत. आगामी निवडणुकीत महाआघाडीला आमचा पाठिंबा असेल मात्र एनडीएसारखी आमची फसवणूक होऊ नये हीच आमची इच्छा आहे अशी अपेक्षा शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान, शेतकऱ्याच्या प्रश्‍नांचा समावेश किमान समान कार्यक्रमात करावा,असा आपला आग्रह आहे. या नेत्यांनी त्यास संमती दर्शवली आहे. पुन्हा एकदा केंद्रीय नेत्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे या दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतरच महाआघाडीत सहभागाचा निर्णय घेणार असल्याचे शेटटी यांनी सांगितले.

Most Popular

To Top