मुंबई – गणेशोेत्सव मंडळांची परवानगी असेल तर खुशाल डीजे वाजवा, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी डीजेवाल्यांना समर्थन दिलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे मधील डीजेवाल्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.त्यावेळी राज ठाकरेंनी डीजेावाल्यांना समर्थन दिलं.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सध्या डीजेंना परवानगी नाही, याबद्दल हायकोर्टात प्रकरण आहे. 19 सप्टेंबरला या बद्दल सुनावणी होणार आहे. उत्सवांमधील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंज करून पाठ फिरवू शकत नाही, असं १४ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं सांगीतलं होतं.
डीजे बंदीच प्रकरण सध्या हायकोेर्टात आहे. सुनावणी होईपर्यत प्रतिक्षा करा, मात्र मंडळ तयार असतील तर खुशाल डीजे वाजवा, असं राज ठाकरेंनी सांगीतलं आहे, असं डीजेावाल्यांनी सांगीतलं आहे. तसंच ऐन सणासुदीच्या काळात ही बंदी घातल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असं डीजे मालकांनी सांगीतलं आहे.
दरम्यान, 19 सप्टेंबरला हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीत काय निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.