सातारा – जिल्हा प्रशासनाने गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांची व्यवस्था करावी तसंच डॉल्बीबाबत अटी शिथील करत डीजेला परवानगी द्यावी, मात्र सरसकट बंदी घालू नये अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.
साताऱ्यात डिजे आणि गणपती विसर्जनाच्या मुद्दयांवरून वाद सुरू आहे, त्या वादात शिवेंद्रराजेंनी उडी घेतली आहे. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले हे गणेशोत्सवामध्ये डॉल्बी वाजवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका घेत सातारा शहरातील गणपतीचं मंगळवार तळ्यात विसर्जन करणार असल्याची भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे.
गणेशोत्सव शांततेमध्ये कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरा केला जाईल अशी आशा नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं