महाराष्ट्र

ओवेसी आणि आंबेडकर यांची हातमिळवणी; आगामी निवडणूका एकत्र लढवणार

मुंबई | एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी आणि भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हातमिळवणी केली आहे. आगामी निवडणुका हे दोन्ही पक्ष राज्यात एकत्र लढवणार आहेत. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दोन्ही पक्षांनी युती केली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांनी हातमिळवणी केल्याने राज्यात इतर पक्षांसमोर एक नवं राजकीय आव्हान उभं राहणार आहे. दोन्ही पक्षांनी दलित-मुस्लिम ऐक्याची हाक दिली आहे. औरंगाबादमध्ये 2 ऑक्टोबरला दोन्ही पक्ष एकत्र सभा घेणार आहेत.

तसंच, युतीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असणार आहे. दोन्ही पक्ष महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहेत.

Most Popular

To Top