कोेल्हापूर – आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण धनंजय महाडिक नावाचा अश्वमेघ सोडणार आहोत, ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी लगाम धरून दाखवावा, असा इशारा महादेव महाडिक यांनी आमदार सतेज पाटलांना दिला आहे. ते कोल्हापूरात एका कार्यक्रमात बोलत होते.
माजी आमदार महादेव महाडिकांनी आमदार सतेज पाटलांची भेट घेतली होती, त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं? महाडिक काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र महाडिक यांनी कार्यक्रमावेळी माईक घेत, माझ्यासाठी कसबा बावडा बंद करण्याचा अधिकार त्याला कुणी दिला. कार्यकर्त्यांना मध्यस्थी न घालता थेट माझ्याशी लढावे. खासदार धनंजय महाडिक नावाचा अश्वमेघ येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत आपण सोडणार आहोत. हिंमत असेल तर त्याची लगाम धरून दाखवावी, असं ते म्हणाले.
तसंच, शिवाजी चौक तरूण मंडळ शक्तीमान आहे. महाडिक कुटुंबियास या महागणपतीचा आशिर्वाद लाभला आहे, महाडिकांना जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाने मोठे केले आहे. खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर लोकसभा आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक निवडणूक रिंगणात असतील, असंही त्यांनी यावेळी सांगीतलं.
