महाराष्ट्र

मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे, कोण अडवतो ते बघतोच- उदयनराजे

सातारा – सातऱ्यातील गणपती विसर्जनाचा वाद दिंवसेंदिवस वाढताना दिसत आहे. साताऱ्यातील मंगळवार तळं हे माझ्या मालकीचं आहे, त्यामुळे तळ्यात गणपती विसर्जन करायला कोण आडवतो ते बघतोच, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी इशारा दिला आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील गणेश मंडळांची तातडीने बैठक बोलवली. बैठकीत ते म्हणाले, गणेश मंडळांनी गणपतीचं विसर्जन मंगळवार तळ्यातच करावं,  कोण अडवतो ते बघतोच. गुन्हे दाखल झाले तर माझ्यावर होतील, मंडळावर नाही. सातारच्या जनतेसाठी मी काहीही करायला मागे पुढे बघणार नाही. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर जिल्हा प्रशासन जबाबदार राहिल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, उदयनराजेंनी चक्क न्यायालयाच्याच निर्णयाला विरोध केला आहे, त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Most Popular

To Top