महाराष्ट्र

साताऱ्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तोडायला आलोय- चंद्रकांत पाटील

सातारा– साताऱ्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तोडायला आलोय, असं महसुलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते साताऱ्यातील माण- खटाव येथे कार्यक्रमात बोलत होते.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कॉंग्रेस -राष्ट्रवादीचे बालेकिल्ले उद्धवस्थ केले. आता माझे लक्ष सातारा जिल्ह्यावर असून हा बालेकिल्ला तोडण्यासाठी मी आलो आहे, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सातारा जिल्ह्यातील गड तोडणार असून यासाठी जिल्ह्यात दोन दिवस थांबणार आहे.चार वषॉंपूवीँ राज्यात सत्तांतर होऊन भाजपा मित्र पक्षांचे सरकार आले आणि खऱ्या अर्थाने ग्रामिण भागाच्या विकासाला चालना मिळाली.

दरम्यान, यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना ही टोेला लगावला, ते म्हणाले, एका वर्षांत हजार कोटी रुपये खर्चाचे हजार किमीचे रस्ते पूर्ण होतील. या रस्त्यावर पुढील दहा वर्ष्यात एकही खड्डा पडणार नाही, मग खड्डेच दिसणार नाहीत मग सुप्रिया ताई कशा बरोबर सेल्फी काढणार?

Most Popular

To Top