देश -विदेश

हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही- मोहन भागवत

नवी दिल्ली– हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही, असं वक्तव्य करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अल्पसंख्यकांची मन जिंकण्याचा प्रयत्न केलाय.

नवी दिल्लीत विज्ञान भवनात संघाची तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलीये. ‘भविष्यातील भारत’ संवादात आज दुसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. एक हिंदू राष्ट्र तयार होणे म्हणजे यात मुस्लिमांना जागा नसणे असं बिल्कुल नाही. ज्या दिवशी असे होईल त्या दिवशी हिंदुत्व राहणार नाही. हिंदुत्व पूर्ण जगाला आपलं कुटुंब मानण्याचा विचार करतो असं भागवत यांनी सांगितलं.

संघ नेहमी राज्य घटनेचा आदर करतो. राज्य घटनेनुसार सत्तेचं केंद्र असलं पाहिजे जर असं झालं नाही तर चुकीचं आहे असंही भागवत म्हणाले.

दरम्यान, आपल्या स्वयंसेवकांनी कधी कोणत्याही पक्षाचे काम करण्यास सांगितलं नाही, उलट राष्ट्राच्या हितासाठी काम करणाऱ्या लोकांना समर्थन देण्याचा सल्ला दिलाय असंही ते म्हणाले.

Most Popular

To Top