महाराष्ट्र

पर्रिकर सोडले तर गोव्यामध्ये सारेच आयाराम, गयाराम आणि घाशीराम- शिवसेना

मुंबई– शिवसेनेचं मुखपत्र सामनातून भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोडले तर गोव्यामध्ये सारेच आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत, अशी जोरदार टीका करण्यात आली आहे.

पर्रिकरांची प्रकृती ढासळली आहे. पर्रिकर हे भाऊसाहेब बांदोडकरांनंतरचे सर्वात लोकप्रिय नेते. ते लवकर बरे व्हावेत म्हणून संपूर्ण गोवा देवाकडे प्रार्थना करत आहे. मंदिरांपासून ते चर्चपर्यंत सगळीकडेच त्यांच्या दिर्घायुषासाठी प्रार्थना केली जात आहे. मात्र पर्रिकरांनंतर भाजपकडे गोव्याचा कारभार पाहिलं असा एकही शुद्ध नेता नाही. एखादा नेता वगळतास सगळेच आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत. राजकीय अस्थिरतेमुळे गोव्याची परिस्थिती सध्या बिकट झाली आहे. तोडून- मोडून बनवलेले हे सरकार भाजप सरकारला फळले नाही.

भाजपमध्ये आता गोव्यात पर्रिकरांनंतर कोण असा प्रश्न विचारला जात आहे. पर्रिकरांना सन्मानाने निवृत्त करून दुसरा नेता शोधण्याचे भाजपने ठरवले, तरी त्यांच्याकडे पर्रिकरांच्या तोडीचा एकही नेता नाही. श्रीपाद नाईक हे सध्या दिल्लीत आहेत. ते सोडले तर इतर सगळेच नेते हे आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत.

Most Popular

To Top