महाराष्ट्र

…म्हणून माझे सासरे मला वैतागले आहेत-हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद– मी नवीन राजकीय पक्ष काढत आहे, म्हणून माझे सासरे रावसाहेब दानवे मला वैतागले आहेत, असं माहिती आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

राजकीय पक्ष काढण्याचा रिकामा उद्योग कशाला करता ? यावरून बायकोचेही बोलणे मला खावे लागतात. पण मी ऐकणार नाही म्हटल्यावर तिनेही ‘तुम्हाला काय करायचे ते करा'”  असे सांगून टाकले.

मी आमदार किंवा खासदार होण्यासाठी पक्ष काढत नाहीये. तेवढच व्हायंच असतं तर माझे सासरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांनी मला कुठूनही तिकीट दिले असते. पण आपल्याला त्यांच्या सोबत जायच नाही. हा ऐकतच नाही म्हणत माझे सासरे डोक्‍याला हात मारून घेतात, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून केले जाणारे राजकारण, चाळीसहून अधिक तरुणांनी केलेल्या आत्महत्या आणि राजकीय पक्षांकडून पसरवली जात असलेली सामाजिक विषमता यामुळे उद्विग्न होऊन आपण राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय घेतला .  मराठा, धनगर तरूणांच्या आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी आपण समुपदेशन यात्रा काढली तरी आत्महत्या थांबल्या नाही ही वस्तुस्थिती आहे. ” असेही आमदार जाधव म्हणाले .

Most Popular

To Top