By
Posted on
अहमदनगर :- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
शेतक-यांवरील गोळीबाराचा निषेध करण्याऐवजी रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांवरचा गोळीबार एक प्रकारे योग्य ठरवला आहे फक्त गोळ्या मारण्याची जागा चुकली असा त्यांचा दावा आहे. गोळीबाराचे समर्थन करणा-या अशा नेत्यांचा आणि त्यांच्या भाजपा पक्षाचा धिक्कार असो.
सरकारने आता आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणा-या शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी, एस टी कर्मचारी, शिक्षक या आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच काढावा म्हणजे झाले. सरकारने आता फक्त तेव्हढेच शिल्लक ठेवले आहे.