शिरूर– शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांना निवडणुकीत मी चितपट करू शकतो, असा विश्वास भीमाशंकरचे माजी चेअरमन देवदत्त निकम यांनी दिली आहे. ते फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते.
गेल्या निवडणुकीत निव्वळ मोदी लाटेवर निवडून आले. आपण केंद्रात मंत्री होणार, अशी आवई त्यांनी प्रचारात उठवली होती. बैलगाडा प्रश्न सोडविणार, पुणे-नाशिक रेल्वे आणणार, गावांचा विकास आराखडा राबविणार, स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देणार, अशा अनेक फसव्या घोषणा त्यांनी केल्या, असं त्यांनी सांगीतलं
आढळराव हे केवळ बोलबच्चन खासदार आहे. हे आता जनतेला कळून चुकले आहे. गेल्या निवडणुकीत मला तयारीला वेळ कमी मिळाला होता. आता सरकारच्या आणि खासदारांच्या अकार्यक्षमतेला जनता वैतागली आहे. त्यामुळे शिरूरमध्ये निश्चित परिवर्तन होईल, असंही ते म्हणाले.
