अशी घडली घटना ?
एक ८ व १२ वर्षीय मैत्रिणी रविवारी दुपारी दर्शनासाठी जात होत्या , तेव्हा आरोपी गणेश निकम आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने दोघीना आमिष दाखवून शेजारच्या शेतात घेऊन गेले.तिथे घेऊन गेल्यावर या नराधमांनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. त्यातील एक पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागल्यामुळे तिला ससून हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आलं
तेव्हा डॉक्टरांच्या तपासातुन हा प्रकार सर्व समोर आला.
त्यानंतर हिंजेवाडी पोलिसांनी दुसऱ्या पीडित मुलीला विश्वासात घेतल्यानंतर,तिने झालेला सर्व घटनाक्रम सांगितला.दरम्यान एक पीडित मुलीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असून
दुसऱ्या पीडित मुलीवर उपचार सुरु आहेत.
सदरीत घडलेल्या घटनेमुळे परिसरातील लोकांनी हळ-हळ व्यक्त केली, हिंजेवाडी पोलिसांनी सादरीत आरोपीना अटक केली असून, अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.