महाराष्ट्र

भाजपच्या प्रवक्त्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

भाजपाचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते मधु चव्हाण विरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शैक्षणिक संस्थेत ही महिला कार्यरत असून मधु चव्हाण यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे आरोप महिलेने केले आहे.

सदरील महिलेने या अगोदरही दोन वेळा पोलिसांकडे तक्रार केली आहे पण तक्रार नोंदवून घेतली गेली नव्हती.आता ही तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

मधु चव्हाण यांचे स्पष्टीकरण

सदरीत महिलेने माझ्यावर वारंवार आरोप केले आहेत स्त्रीत्वाचा फायदा घेऊन सादरीत महिला माझ्यावर खोटे आरोप करत आहे. माझा न्याय व्यवस्थेवर आणि पोलिसांवर परिपूर्ण विश्वास आहे तरी मी माझ्या पक्षश्रेष्ठींना याबाबत सर्व माहिती दिलेली आहे.

Most Popular

To Top