महासत्ता :- गेल्या पंधरा वर्षांपासून माझ्या विरोधात राष्ट्रवादीला आणखीन चांगला उमेदवार सापडलेला नाही. तर अमोल कोल्हे यांना हे माळी समाजाचे आहेत म्हणून माझ्या विरोधात उभा करणार असतील. त्यांचं काही गणित असेल.
शिरुर लोकसभेत कुणी कितीही कोल्हेकुई केली, तरी निवडणूक आपणच जिंकणारच असा विश्वास शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवबंधन सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे शिरुरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, या पार्श्वभूमीवर शिवाजीराव पाटलांनी हा टोला लगावला.