महाराष्ट्र

आम्हाला शिकवू नका; पायरीने रहा; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना इशारा

सातारा-  आम्हाला लोकप्रतिनिधींची जबाबदारी शिकवू नका, तुमच्या पायरीने रहा,” असा खरमरीत इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शिवेंद्रसिंहराजेंना दिला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रक काढून शिवेंद्रराजेंवर जोरदार टीका केली आहे. या पत्रकात ‘आम्ही घेतलेल्या कणखर भूमिकेमुळेच प्रशासनान, जिल्हापरिषदेच्या शेती शाळेतील जागेत कृत्रिम तळे काढण्यास सुरवात केली आहे. नाही तर गणेश भक्तांना कण्हेर धरणाच्या खाणीत विसर्जनासाठी जावे लागले असते. जिल्हा परिषदेत सत्ता तुमचीच आहे ना, तेथेही तुम्ही करंगळी धरूनच चालत आहात. त्यांचेच ऐकले जाते हे एकदा जनतेसमोर तुम्ही जाहीर करा,  असं म्हटलं आहे.

तसंच, गणेश भक्तांची आम्ही माफी मागून मंगळवार तळे विसर्जनास खुले होणार असेल तर आम्ही केव्हाही माफी मागण्यास तयार आहोत. तथापि तुम्ही तुमच्या बॅंका व संस्थांतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आणले,त्याबद्दल तुम्ही गांधी मैदानावर तुमचे नाक घासणार का, असा प्रश्‍न उदयनराजेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, शिवेंद्रराजेंचे बोलणे म्हणजे ती मागणी आणि आम्ही सामान्य व्यक्तींचे मत मांडले की तो स्टंट होतो. आम्ही स्टंटबाज तर तुम्ही स्पॉटबॉय का?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Most Popular

To Top