- औरंगाबाद- धनुभाऊ लोकसभेची तयारी करत आहात की काय असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना केला त्या औरंगाबाद मध्ये बोलत होत्या.
राष्ट्रवादीच्या वतीने औरंगाबाद मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सुप्रिया सुळे यांच्याआधी धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. आपल्या तडाखेबंद भाषणाचा शेवट मुंडे यांनी हिंदी शायरीने केला. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या अस्सलिखित हिंदींचे कौतुक करतांनाच तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? असा चिमटा देखील काढला.
धनंजय मुंडे एवढ चांगले हिंदी बोलतात, यावरून ते लोकसभेची तयारी तर करत नाही ना? असे मला वाटले. पण ते औरंगाबादेत बोलत आहेत, आणि हा त्यांचा मतदारसंघ नाही असे म्हणत त्यांनी मुंडे यांची फिरकी घेतली.