मुंबई :- सेल्फीच्या हौसेपोटी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका असे राज्य सरकारकडून आवाहन केले जाते,मात्र मुख्यमंत्र्यांच्या मिसेस अमृता फडणवीस यांनी काल अँग्रिया क्रुझ चा टोकाला जाऊन घेतलेल्या सेल्फी वर खूपच सोशल मीडियावर वादंग माजला.
मुंबई-गोवा क्रूझचा उद्घाटन सोहळा कालच पार पडला याच क्रूझच्या अगदी टोकाला जाऊन सेल्फी घेण्याचा मोह अमृता फडणवीस यांना आवरला नाही. या एकट्याच क्रूझच्या टोकाला जाऊन सेल्फी घेत होत्या सर्वात पुढच्या टोकावर सुरक्षा रेलिंग ओलांडून अमृता फडणवीस यांनी सेल्फी काढली त्या जिथे बसल्या होत्या तिथे जाण्यास बंदी आहे. बंदोबस्तात असलेल्या पोलिसांचा जीव मात्र भांड्यात पडला होता.
अमृता फडणीसच स्पष्टीकरण
मी क्रुझ च्या टोकावर फक्त शुद्ध हवा घेण्यासाठी गेल्याचं त्यांनी म्हटलं, झालेल्या घटनेने कुणाचं नुकसान होत असेल तर आपण माफी मागायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितलं.