नाशिक- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौऱ्यावर एकाच गाडीतून प्रवास केलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्याच बरोबर नाशिकमध्ये शिवसेना-भाजप युतीच्या प्रवासाला सुरुवात झाली का? अशी चर्चा रंगायला आता सुरुवात झाली आहे.
शिवसेना आमदार अनिल कदम यांच्या नाशिकमधील निफाड तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले होते.
दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नाही, असा पुनरुच्चार शिवसेनेकडून वारंवार होत असला तरी नाशिकमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळाल्या मुळे आता राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.