महासत्ता- निवडणुकीचा विचार न करता आधी पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावावा असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
सर्जिकल स्ट्राइक आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला. पाकिस्तानला धडा शिकवायची हीच वेळ आहे’ गुप्तचर यंत्रणांच्या अपयशाबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी मिळालेली गुप्त माहिती ज्यांनी गांभीर्याने घेतली नाही, त्यांना पदावरून दूर हटवले पाहिजे. इतकी महत्त्वाची माहिती दुर्लक्षित करणे, कदापि खपवून घेता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, या हल्ल्यानंतर सरकारने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, शांत बसायचे म्हणजे नक्की काय करायचे? शांत बसून राहणे, ही मर्दानगी नव्हे. मात्र, तरीही सरकार म्हणते तसे आम्ही शांत बसून आहोत. पण मग तुम्ही मर्दानगी दाखवा, पाकिस्तानात घुसा. असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.