महाराष्ट्र

राज्यस्तरीय Media Campaning पुरस्कारने ज्ञानेश्वर बडे यांचा गौरव…

बीड- बीडमध्ये स्वाभिमानी प्रबोधीनीच्यावतीने ‘स्वाभिमानी प्रबोधीनी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा 2018’ आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट संपादकीय आणि ऑनलाईन लिखाण क्षेत्रातील पुरस्कार ज्ञानेश्वर विठ्ठल बडे यांना देण्यात आला.वर्ल्ड गिनीज बुकात रेकाॅर्ड केलेले रंधवे बापू तसेच बालहक्क आयोगाचे अध्यक्ष मा.प्रवीण घुगे आणि बीडचे डीवायएसपी यांच्या हस्ते ज्ञानेश्वर यांचा गौरव करण्यात आला.

अतिशय कमी वेळेत त्यांनी महासत्ता.कॉम या न्युज पेपर संपादकांची जबाबदारी घेऊन लोकप्रिय राजकीय विश्लेषण करून अल्पावधीतच 1 कोटी पेक्षा जास्त लोकनपर्यंत ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून पोहचवतात.

ज्ञानेश्वर यांनी MBA-IT शिक्षण पूर्ण केल्यानंतर SOCIAL Media Companing म्हणून Google , Monma , व Have Technology अश्या IT क्षेत्रातील कंपनी सोबत कार्य करतात.

अल्पावधीतच सर्वान पर्यंत online Portal . Social Media माध्यमातून तत्पर बातमी यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आयोजकांनी व कार्यक्रमाच्या मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून त्यांच्याकडून नवीन Media Campaning विषयी जाणून घेतले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंधवे बापू यांची उपस्थिती होती तसंच राज्यातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती.

माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला स्वाभिमानी प्रबोधीनीच्यावतीने गौरवण्यात आलं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र मी माझा हा पुरस्कार माझ्या देशासाठी शहिद झालेल्या माझ्या बांधवांना अर्पण करत आहे. त्यांच्या प्राणांची किंमत भरता येणार नाही मात्र आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत. असं मत ज्ञानेश्वर बडे यांनी यावेळी उपस्थित केलं.

दरम्यान, या कार्यक्रमात मिळालेले पुरस्कार शहिद जवानांना अर्पण करून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Most Popular

To Top