परळीतील सभेला अभूतपुर्व गर्दी; धनजंय मुंडेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
परळी- परळीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेची सांगता सभा पार पाडली. या सभेला अनेक कार्यकर्त्यांनी अभूतपुर्व गर्दी केली होती.
सभेत बोलतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस तुम्ही जर आमच्या नेत्याला धमकी द्यायचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही असा इशाराही मुंडे यांनी दिला.
भाजपच्या सोळा मंत्र्यांचा भ्रष्ट्राचार आम्ही उघड केला आहे. तुम्ही जर देवेंद्र गंगाधर फडणवीस असाल तर या नेत्यांवर कारवाई करून दाखवा, असं आवाहन यावेळी धनंजय मुंडेंनी केला.
समोरापाच्या मुद्यावरून धनंजय मुंडेनी पंकजाताई मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली.
समोरापाची भाषा जर करत असाल तर येणाऱ्या निवडणुकीला समोरा समोर या पाहूया कोणाचा समारोप होतोय ते. असंही ते म्हणाले.
दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादीचा खासदार निवडून द्यायचा आहे, त्यामुळे खाद्यांला खांदा लावून आम्हाला साथ द्या, असं आवाहनही मुंडेंनी यावेळी केलं.
