संपादकीय :- मातब्बर घराणेशाहींचा जिल्हा तसेच साखर सम्राटांचा जिल्हा असलेला नगर जिल्हा खासदारकीला उत्तर व दक्षिण भागात विभागला आहे. पण सध्या चर्चेत असलेले डॉ.सुजय विखे यांनी दक्षिणेत नगर मधे आपल्या उमेदवारीसाठी दोन वर्षापासून चालवलेली राजकीय व सामाजिक कार्य स्पष्ट दिसून येतात पण हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नाहीये, दक्षिण नगर मध्ये राजकीय घुसखोरी करून यांना यश संपादन होईल हे सध्यातरी काल्पनिक वाटते कारण ही तसेच आहे
दक्षिण नगर मधील मातब्बर नेते सध्या बोलत नसले तरी स्पष्टपणे अंतर्गत विरोध करताना दिसून येतात त्यांना येथे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळेल हे सध्या तरी अशक्यच वाटते तरी येणारा काळात हे आपल्याला दिसून येईल पण या भागातील दक्षिणेतील असलेले नेते यांनी अंतर्गत विरोध तसेच सुजय विखे यांचा मार्ग रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न यशस्वी चालू ठेवला आहे यांना दक्षिणेतून विजय मिळेल हे सध्या तरी पूर्णपणे व राजकीय दृष्ट्या न उलगडणारे गणित दिसून येते.
सुजय विखेनी प्रचार धुमधडाक्यात वेगाने सुरू केलाय पण दक्षिण नगर मध्ये प्रत्येक घराण्याला मानणारा गटही तितकाच मोठा आहे व जसे विखे घराणे राजकारणात उत्तरनगर मधे कोणाचा जम बसून देत नाहीत तसेच दक्षिण नगर मधे सुजय विखेचा बसून देतील असे आत्ता तरी दिसून येत नाही.
डॉ.सुजय विखे यांना दिल्ली जवळ दिसत असेल पण दक्षिणेतील नेत्यांनी त्यांचा मार्ग पूर्णपणे घडवलाय त्यामुळे सुजय यांच्या दक्षिणेतील घुसखोरीला प्रचंड विरोध व आता अंतर्गत विरोधालाही सामोरे जावे लागणार आहे , त्याचा प्रवास दिल्ली पर्यंत असला तरी मुंबईतच अडवणूक होईल असेही संकेत मिळत आहेत.