परळी वै| सध्या बहू चर्चेत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आणि त्यातल्या त्यात या निवडणुकीत काही हाय होल्टेज लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यातच बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातही ग्रामविकास मंत्री तथा भाजपच्या पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या दोघा भाऊ-बहिणीतील लढत यंदाही चुरशीची आणि रोमांचक होणार आहे.
परळी मतदारसंघात बाजी मारण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत धनंजय मुंडेंना पराभव करत पंकजा यांनी विजय खेचून आणला होता. परंतु यावेळी चित्र मात्र उलटे झाल्याचे दिसत असून यावेळी ही निवडणूक पंकजा यांच्या साठी काठीन ठरण्याची दाट शक्यता आहे कारण असे की सलग मागील निवडणुकांमध्ये राज्यात भाजप चे जरी वर्चस्व दिसून आले असेल परंतु परळी मतदारसंघात मात्र हे चित्र उलट होते,मग त्यात परळी मतदारसंघातील जिल्हा परिषद सर्कल,ग्रामपंचायता ,पंचायत समिती, नगरपालिका, कृ उ बा स अश्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्था धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत ,आणि 2019 ला झालेल्या पराभवाचं वचपा काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी नव्याने डावपेच आखले आहेत.
आगामी विधानसभेला अजून काही महिने बाकी असतानाच धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली असून त्यांनी मतदारांशी ‘डोअर टू डोअर’ भेटी गाठीची संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी परळीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मतदारसंघातील महिलांच्या प्रश्नांसंदर्भात धनंजय मुंडेंनी पत्नी राजश्री यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. यामुळे प्रीतम मुंडे आणि पंकजा या मुंडे भगिनींना टक्कर देण्यासाठी भावजय सौ राजश्री धनंजय मुंडेंनी संवाद मोहीम हाती घेतली आहे.
यामुळे परळी मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार यावर सध्या चर्चेला उधाण आलं आहे. ताई,भाऊ की तिसरे आणखी कोणी? अशातच धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती राजश्री मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून परळी शहरातील प्रभागनिहाय महिलांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघातील सामान्य महिलांना कोण कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे? त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत? या जाणून घेण्यासाठी तसंच त्या तात्काळ सोडवण्याचे काम सध्या राजश्री मुंडे करत आहेत त्यांच्या या निर्णयामुळे आणि त्यांच्या मायाळू स्वभावामुळे आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचा आगामी निवडणुकीत धनंजय मुंडे यांना चांगलाच फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
धनंजय मुंडेंच्या या नव्या खेळीमुळे पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं आहे.