महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीच्या कामात सहयोगाचे सीआयआयच्या कंपन्यांचे अभिवचनजागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह कार्यक्रम 
मुंबई, दि. 6 : महिला सक्षमीकरण, संरक्षण तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. माता व बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये खासगी उद्योग (कॉर्पोरेट) क्षेत्राने सहयोग देण्याचे जाहीर अभिवचन शासनाला दिले.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी- शर्मा, कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या इंडियन वुमन नेटवर्कच्या (सीआयआय-आयडब्ल्यूएन) अध्यक्षा श्रीमती अनिता मधोक, वरिष्ठ पत्रकार तथा सिटीजन अगेन्स्ट मालन्युट्रीशन या संस्थेच्या नीरजा चौधरी यांच्यासह कार्पोरेट क्षेत्रातील 30 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री ॲड. श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सर्वच क्षेत्रात सक्षमतेने काम करत असताना सकारात्मक विचारांचे मुक्तपणे स्वागत केले पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजनांची अंमलबजावणी करत असतानाच त्यांच्या संरक्षणाकडेही सरकारचे लक्ष आहे. प्रत्येक विभागीय आयुक्तालय स्तरावर महिला आयोगाचे कार्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे, असेही त्या म्हणाल्या.

मंत्री ॲड. ठाकूर यांना दिले अभिवचन

       महिला व बालविकासमंत्री . श्रीमती ठाकूर यांना सीआयआयच्यासुमारे 30 प्रतिनिधींनी बालके, महिला तसेच किशोरवयीन मुलींमधील कुपोषणनिर्मलनसाठी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील महिला यांच्या विकासासाठी सहभाग देण्यास इच्छुक असल्याचे लेखी अभिवचन दिले. बालसंस्थांमधील मुलांचे शिक्षण, आरोग्य तसेच पुनर्वसन आदींसाठी राज्यशासनाने स्थापन केलेल्याबाल न्याय निधीमध्येही या संस्था योगदान देणार आहेत.

कार्यक्रमात पोषण पंधरवड्याचा शुभारंभ, ‘यशोदा माता अंगत पंगतयोजनेचा शुभारंभ तसेच पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा सत्कार करण्यात आला.

पोषण पंधरवड्याचा शुभारंभ

पोषण पंधरवडा दि. 8 ते दि. 22 मार्च, 2020 या कालावधीत संपूर्ण राज्यभरात साजरा केला जाणार आहे. पोषण पंधरवडादरम्यान पूर्ण पोषणया संकल्पनेवर भर देण्यात आलेला असून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

यशोदा माता अंगत-पंगतयोजनेचा शुभारंभ

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत यशोदा अंगत-पंगतही नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यभरात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गरोदर मातांनी अंगणवाडी केंद्रात एकत्र येऊन सहभोजन करावयाचे आहे. सहभोजनादरम्यान अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या (एएनएम) गरोदर मातांना पोषण आहाराबाबतचे महत्त्व सांगणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत भोजनानंतर लोह आणि फॉलिक ॲसिडच्या (आयएफए) गोळ्या अंगणवाडी केंद्रातच देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर नांदेड जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेली ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

यावेळी सचिव श्रीमती कुंदन यांनी माहिती दिली, पोषण अभियानअंतर्गत राज्य शासनाने पोषण संकल्पकेला असून त्याअंतर्गत पुढील दोन वर्षात बाळाचे पहिले 1 हजार दिवस, योग्य स्तनपान, पूरक पोषण आहार, वाढीचे सनियंत्रण व संवर्धन आणि किशोरवयीन मुलींचे शिक्षण, आहार व लग्नाचे योग्य वय या पंचसूत्रावर विशेष लक्ष देण्याचे निश्चित केले आहे.

पोषण अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित पुरस्कारार्थी :

अ) कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे (सीएएस) उत्कृष्ट व्यवस्थापन आणि अंमलबजावणी :

उत्कृष्ट जिल्हा : 1. प्रथम क्रमांक : धुळे,

                         2. द्वितीय क्रमांक (विभागून) : 1) चंद्रपूर,

2) यवतमाळ.

उत्कृष्ट प्रकल्प:1. प्रथम क्रमांक (विभागून) : 1) धुळे-3 (ग्रा.), जि. धुळे, 2) चाकूर (ग्रा), जि. लातूर

                        2. द्वितीय क्रमांक : धुळे-1 (ग्रामीण), जि. धुळे

उत्कृष्ट मुख्यसेविका –

1. प्रथम क्रमांक : श्रीमती शर्मिला जाधव, प्रकल्प- मौदा, जि. नागपूर

2. द्वितीय क्रमांक : श्रीमती शिलाताई चरणदास वाळके, प्रकल्प-चामोर्शी, जि. गडचिरोली

उत्कृष्ट अंगणवाडी सेविका :

1. प्रथम क्रमांक – श्रीमती रेखा काशिनाथ शिंदे, प्रकल्प- मंठा, जि. जालना (अंगणवाडी क्र.27514120203)

2. द्वितीय क्रमांक- श्रीमती संगिता गजानन ठाकरे, प्रकल्प- वाशिम(ग्रामीण) (अंगणवाडी क्र. 27502060117)

उत्कृष्ट अंगणवाडी मदतनीस :

1. प्रथम क्रमांक : श्रीमती धोंडुबाई माधवराव बुटेकर, प्रकल्प -मंठा, जि. जालना

ब) जन आंदोलन

उत्कृष्ट जिल्हा पुरस्कार :          1. प्रथम पुरस्कार अमरावती

                                                2. द्वितीय पुरस्कार कोल्हापूर

उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार :          1. प्रथम पुरस्कार औरंगाबाद-2, जि-औरंगाबाद.

                                                2. द्वितीय पुरस्कार वरुड, जि.अमरावती.

 क) समुदाय आधारित उपक्रम (कम्युनिटी बेस्ड इव्हेन्ट- सीबीई)/ व्यापक शैक्षणिक दृष्टीकोन (इनक्रिमेंटल लर्निंग अप्रोच- आयएलए)/ इ-आयएलए :

उत्कृष्ट जिल्हा –                       1. प्रथम क्रमांक – सातारा.

                                                2. द्वितीय क्रमांक – नागपूर.

ड) आकार बालशिक्षण कार्यक्रम :

1) उत्कृष्ट मुख्यसेविका श्रीमती वंदना नानवटे, जि. यवतमाळ

2) उत्कृष्ट अंगणवाडी सेविका श्रीमती विजयश्री प्रविण सावंत, साजेगाव, ता. माणगाव, जि. रायगड.

इ) स्वस्थ भारत प्रेरक, जिल्हा समन्वयक, गट समन्वयक, राज्य कक्षातील प्रकल्प सहाय्यक :

वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी अधिकारी श्री. जे. बी. गिरासे, उप आयुक्त तथा सहप्रकल्प समन्वयक

वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी  श्री. रमेशबाबू वसीरेड्डी, वरिष्ठ तांत्रिक तज्ञ, जागतिक बँक

उत्कृष्ट स्वस्थ भारत प्रेरक :    1. प्रथम पुरस्कार – श्री.होशांगस्वामी काळे, जि. धुळे

                                            2. द्वितीय पुरस्कार – श्रीमती प्रियांका तोतरे, जि. गोंदिया

उत्कृष्ट जिल्हा समन्वयक :       1. प्रथम पुरस्कार – श्री.शिवानंद धनंजय वासनकर, जि. अमरावती.

                                             2. द्वितीय पुरस्कार – श्री.ज्ञानेश्वर भिक्कया किर्तनकर, जि. हिंगोली.

उत्कृष्ट गट समन्वयक :       1. प्रथम पुरस्कार – श्रीमती रोहिणी श्रीधर गुर्नुळे, चंद्रपूर (ग्रा), जि. चंद्रपूर

                                     2. द्वितीय पुरस्कार-श्री.राहुल मारोतीराव वाघमारे,बाळापूर आखाडा (ग्रा),

                                                                         जि. हिंगोली.

राज्य कक्षातील उत्कृष्ट प्रकल्प सहाय्यक :

                                                1. प्रथम पुरस्कार – श्री.साहिल शिंपी

                                                2. द्वितीय पुरस्कार – श्री.प्रशांत ठाकरे

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.6.3.2020

Most Popular

To Top