महाराष्ट्र

असा होता आठवडा (दि. १ ते ७ मार्च, २०२०)

गेल्या आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा (न्यूज डायजेस्ट)

दि. 1 मार्च, 2020

·      मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत, म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत संपन्न. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड उपस्थित.

·      नाशिक येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवाशी कोरोनासाठी निगेटीव्ह,राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण  नसल्याची  आरोग्यमंत्री  श्री.  राजेश टोपे यांची माहिती.

००००

दि. 2 मार्च, 2020

·      आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्या हस्ते राज्यस्तरीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ.  या हत्तीरोग मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर स्वप्नील जोशी हे आहेत. हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी 2 मार्च ते 20 मार्च 2020 पर्यंत नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, या 6 जिल्ह्यात राबवणार, या मोहिमेची व्यापकता लक्षात घेऊन कालमर्यदेत वाढ.

·      भेसळयुक्त बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची  कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे यांची विधानसभेत माहिती.

·      मिठागराच्या जागेत परवडणारी घरे बांधण्यासाठी पर्यवेक्षण, सनियंत्रण समिती गठीत करण्याची  महसुल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत माहिती.

·      मराठी नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास डॉ.श्रीराम लागू पुरस्कारदेण्याचा निर्णय.

·      मौजे डिस्कळच्या गटांच्या नोंदी 31 मार्चपर्यंत भूमी अभिलेखात घेणार असल्याची  महसुल राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांची विधानसभेत माहिती.

·      माथाडी कामगार सुरक्षा कल्याण मंडळाच्या मुदत ठेव रकमेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी  22  जणांना अटक झाल्याची गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती.

·      येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये आठ नवीन बॅरेकचे काम सुरू झाल्याचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती.

·      गोवंश हत्या प्रकरणातील मांस तपासणी अहवाल मुदतीत मिळण्यासाठी कालावधी निर्धारित करणार असल्याची  गृह राज्यमंत्री श्री. शंभुराज देसाई यांची विधानसभेत माहिती.

·      कोरोनाबाबत समाजमाध्यमांमध्ये फिरणारे संदेश चुकीचे, महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही; नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आरोग्यमंत्री  श्री.राजेश टोपे यांचे विधानसभेत आवाहन.

·      संरक्षण व सामरिक विषयात संशोधन व उच्च अध्ययनासाठी उत्कृष्ट अध्यासन केंद्र स्थापन करण्याकरिता  भारतीय हवाईदल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार झाला. भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जनसिंह यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या अध्यासनाला मार्शल अर्जनसिंह यांचे नाव.

·      कायमस्वरुपी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची  उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची विधानसभेत माहिती.

·      जात प्रमाणपत्र वैधता मिळण्यास येणा-या अडचणी दूर करणार असल्याची  आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी पाडवी यांची विधानपरिषदेत माहिती.

·      अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेत सूतोवाच.

·      पात्र विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल अशी  सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेत माहिती.

·      नाशिक, अमरावती, औरंगाबाद, पुणे या विभागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जळगाव, बीड,  अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा या जिल्ह्यामधील 129 गावांमध्ये 1978 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे व गारपीटीमुळे 842 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले. दोन्ही मिळून एकूण बाधित क्षेत्र 2820 हेक्टर, शेती पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची मदत व पुनर्वसन मंत्री  श्री. विजय वडेट्टीवार यांची विधानपरिषदेत माहिती.

·      जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील विविध पुल तसेच शहरातील आयर्विन पुलाला पर्यायी पूल बांधणे, शहरात बिकट होत असलेल्या वाहतुकीचा प्रश्न याबाबत बैठक. राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम उपस्थित. सांगली जिल्ह्यातील तुंग चोपडेवाडी पुलाचे राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे श्री. पाटील यांचे निर्देश.

·      सांगली-कोल्हापूर परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांच्या मदतीसाठी कुर्ला पश्चिम येथील (कुर्लेकर) रहिवाशांनी मदतफेरी काढली होती. त्यामध्ये जमा झालेल्या रोख 1.5 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द.

·      अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याचे  उपमुख्यमंत्री  श्री. अजित पवार यांचे विधानपरिषदेत माहिती.

·      शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवणार असून लवकरच एक लाख थाळ्या दररोज देण्याचे नियोजन करण्यात आले असून तालुकास्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असल्याची, अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती.

·      ग्रामविकास विभागाच्या 16 हजार 700 किलोमिटर लांबीच्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असल्याचे

ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती.

·      शेतकऱ्यांची मानहानी न होता कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात येत असल्याची  सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती.

·      राज्यात सात जण निरीक्षणाखाली; कोरोनाचा एकही संशयीत रुग्ण नसल्याचे आरोग्यमंत्री  श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·      उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योगाच्या समस्यांबाबत बैठक. या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, वस्रोद्योग मंत्री अस्लम शेख, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित. वस्त्रोद्योगाला मदत करण्यासाठी  शासन सहकार्य करणार असल्याचे श्री. पवार यांचे सूतोवाच.

·      सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या  निविदा प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात विधानभवनातील दालनात विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा आढावा बैठक. या बैठकीस नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे उपस्थित. महत्वाचे मुद्दे :- मीरा- भाईंदर शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन चेना नदीचे पाणी अडवून शहराला मिळण्याच्या मागणीबाबत अभ्यास करा, उल्हासनगर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असतानाही वालधुनी नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित झाली आहे. याबाबत तपासणी करुन कार्यवाही करा, शहापूरला बाहुली प्रकल्पाचे पाणी गुरुत्व पद्धतीने मिळावे यासाठी कार्यवाही करा. घाटनदेवी पाणी योजनेसाठी सर्वेक्षण करा, सफाई कामगारांच्या पाल्यांना नोकरीमध्ये कायम ठेवण्याच्या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करा. अंबरनाथ- बदलापूर पाणीपुरवठा योजनेवर महिन्याभरात तांत्रिक कार्यवाही पूर्ण करा, जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा, माळशेजघाट येथे काचेचा स्कायवॉक विकसित करा.

·      माथेरान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्याद्वारे  आढावा.

·      दोहा (कतार) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून शैक्षणिक केंद्र सुरू करण्यासाठी कतार शासनाशी सामंजस्य करार झाल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची माहिती.

·      माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे हे दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने शासनातील जनसंपर्क विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेत उपस्थित.

                                                   ०००

दि. 3 मार्च, 2020         

·      मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद :- महत्वाचे मुद्दे

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत ( ३ मार्च २०२० रोजी दुपारी १२ पर्यंत) १० लाख लाभार्थींचे प्रमाणीकरण पूर्ण, पोर्टलवर अपलोड केलेली कर्जखाती : ३५ लाख ८०९,जाहीर झालेली कर्जखाती : २१ लाख ८१ हजार ४५१,पहिली यादी (चाचणी स्वरुपात) २४ फेब्रुवारी रोजी : ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्जखात्यांची,दुसरी यादी २८ फेब्रुवारी रोजी : १५ जिल्ह्यातील २१ लाख ८१ हजार कर्जखात्यांची ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे गडचिरोली, अमरावती,यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, नाशिक या ६ जिल्ह्यांतील ५ लाख कर्जखात्यांची यादी नंतर प्रसिद्ध करणार, शेतकऱ्यांकडून आधार प्रमाणीकरण पूर्ण: १० लाख ३ हजार ५७३,रक्कम प्रत्यक्ष जमा :  आत्तापर्यंत ७ लाख ६ हजार ५०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४ हजार ८०७ कोटी रुपये.

कर्जमुक्ती योजनेतील लक्षणीय बाबी :

·      केवळ २८ दिवसांत पोर्टल सुरु,  महाआयटी तर्फे संपूर्णपणे स्वत: विकसित सॉफ्टवेअर. कुठल्याही खासगी व्हेंडरचा समावेश नाही,  उच्च क्षमतेचे सर्व्हर व क्लाऊड तंत्रज्ञान पोर्टलसाठी उपयोगात आणल्याने ८० हजारापेक्षा जास्त आपले सरकार सेवा केंद्र व बँका यांना विना अडथळा आधार प्रमाणीकरण शक्य, प्रतिदिन ४ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पोर्टलद्वारे पूर्ण होण्याची अपेक्षा,

·      मराठीचा पूर्ण वापर- पात्र शेतकऱ्यांची यादी मराठीत तसेच प्रमाणीकरण व तक्रार नोंद पावती सुद्धा मराठीतच. सहकार विभाग, महसूल विभागावार योजनेची संपूर्ण जबाबदारी. माहिती तंत्रज्ञान विभागाने दिला अविरत तांत्रीक सपोर्ट, प्रशिक्षण व्हिडीओ, सहज समजेल अशा प्रशिक्षण पुस्तिका यामुळे सर्व स्तरावर यशस्वी प्रशिक्षण.

·      आधार प्रमाणीकरण करण्याचा मूळ उद्देश कर्जखात्यात किती रक्कम आहे त्याची शेतकऱ्यांना माहिती देऊन मान्यता घेतल्याने अर्ज करण्यासाठी रांगा लावण्याची वेळ नाही.

·      आधार जोडणीमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणे व इतर योजनांचा लाभ देणे शक्य.

असा आहे फरक

२०१९ ची कर्जमुक्ती योजना /२०१७ मधील कर्जमाफी

·      महात्मा फुले योजनेत कुठलाही फॉर्म भरून घेतला जात नाही. २०१७ मधील योजनेत शेतकऱ्यांना क्लिष्ट फॉर्म भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे.

·      शेतकऱ्यांना पोर्टलवर ऑनलाईन लॉगीन करण्याची आवश्यकता नाही 

·      सध्याच्या योजनेत केवळ २ ते ३ मिनिटांत प्रमाणीकरण होत असल्याने वेळेचा अपव्यय नाही

·      बँकांना भरावयाची माहिती सुलभ केल्याने पोर्टलवर लगेच अपलोड. त्यावर केवळ संगणकीय  प्रक्रिया करून पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा व तालुका पातळीवर प्रसिद्ध करणे शक्य. २०१७ साली शेतकऱ्यांची यादी योजना संपल्यावर प्रकाशित.

·      महात्मा फुले योजनेत बँकेने भरावयाच्या माहितीमध्ये आधार क्रमांक बंधनकारक,

·      सध्याच्या योजनेत पोर्टल हे आपले सरकार सेवा केंद्र, बँका तसेच स्वस्त धान्य दुकानंशी जोडण्यात आले.

·      अपात्र नावे वगळण्याकरिता आयकर विभागाशी समन्वय,सध्याच्या योजनेत प्रमाणीकरण व तक्रार नोंद पावती मराठीत,पोर्टलवरील विविध मोड्यूल्स वेगवान व लवचिक. त्यामुळे एकूणच तांत्रिक प्रक्रियेतील उणीवा आणि अडचणी तत्काळ दूर.

·      सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी  सोडविण्यासाठी  गतिने कार्यवाही करणार असल्याची  नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती.

·      झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देणार असल्याची नगर विकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती.

·      पत्राचाळीतील 672 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी  गतिने प्रकल्प उभारणार असल्याची गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत माहिती.

·      अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती करणार असल्याची  अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची विधानपरिषदेत घोषणा.

·      मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात  आल्याने या संस्थेची स्वायत्तता कायम ठेवणार, पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात या संस्थेसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्याची बहुजन कल्याण मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांची घोषणा.

·      मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करणार असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.अमित देशमुख यांची विधानपरिषदेत माहिती.

·      अनाथ मुलांना खुल्या संवर्गात एक टक्के आरक्षणाबाबत निर्णयाची अंमलबजावणी होण्यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांची लवकरच बैठक घेण्याची उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची विधानसभेत घोषणा.

·      अहमदनगरच्या जोडप्याला मारहाण प्रकरणाची उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची  गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांची विधानसभेत घोषणा.

·      कोल वॉशरीज निविदा प्रक्रियेला स्थगिती  देण्यात असल्याची  उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई यांची विधानसभेत माहिती.

·      रस्त्यांची कामे कालमर्यादेत, गुणवत्तेने न झाल्यास कंत्राटदारांवर कारवाई करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.अशोक चव्हाण यांची विधानसभेत घोषणा.

·      कांदिवली (पूर्व) येथील आकुर्ली प्रसूतीगृहाच्या कामास सहा महिन्यात गती देणार असल्याची नगर विकास राज्यमंत्री श्री.राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची विधानसभेत माहिती.

·      28 कामगारांना एका महिन्यात मदत ; आरोग्य योजनेत सफाई कामगारांच्या समावेशासाठी धोरण आखणार असल्याचे डॉ. विश्वजित कदम यांची विधान परिषदेत माहिती.

·      अंमली पदार्थांपासून तरुणाईला रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार असल्याची गृहमंत्री  श्री.अनिल देशमुख यांची विधानपरिषदेत माहिती.

·      मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश :-

·      आदिवासींमधील बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्थापन कृती दलाच्या (टास्क फोर्स) आवश्यक उपाययोजनांची गतिने अंमलबजावणी करा. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयांच्या खाटांचा क्षमतेत वाढ तसेच श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही करा,जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांच्या डॉक्टर, परिचारिका व अन्य रिक्त पदे त्वरीत भरण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने गतिने कार्यवाही करा,आरोग्य सेवा, शिक्षणासाठी कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) निधीतून तसेच अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्या, वसई- विरार महानगरपालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये महानगरपालिकेला चालविण्यासाठी देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने तपासून कार्यवाही करा, स्थानिकांसाठी पिण्याचा पाण्याची टंचाई होणार नाही याची काळजी घ्या.  तारापूर अणुशक्ती केंद्राच्या परिसरातून आणीबाणीच्या प्रसंगी  गतिने बाहेर पडता यावे यासाठी रस्त्यांचा आराखडा तयार करा.

·      नवे वीज धोरण लवकरच; शंभर युनिट पर्यंत वीज मोफत; शेतकऱ्यांना दिवसा चार तास वीज देण्याचे प्रस्तावित असल्याची  उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची विधान परिषदेत माहिती.

·      माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची दिल्ली येथे बीबीसी (मराठी) आणि उत्तर प्रदेश माहिती केंद्राला भेट.   

·      राज्यातील विद्यापीठांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासन प्रयत्नशील, विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागणारा निधी आणि अर्थसंकल्पात करावी लागणारी तरतूद यासाठी विद्यापीठांची एकत्रित माहिती आवश्यक, त्यासाठी मंत्री कार्यालयामार्फत विद्यापीठांच्या कुलसचिवांना पत्र, यामध्ये विद्यापीठांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नाही- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांचा खुलासा.

·      रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्रिसिजन मेटल्स, नाशिक येथील ड्रिल बीट इंटरनॅशनल तसेच वडपे- भिवंडी येथील गोदरेज अँड बॉईस कंपनी लिमिटेड या आस्थापनांमधील कामगारांच्या समस्यांबाबत राज्यमंत्री श्री.बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक,  विविध खाजगी आस्थापनांमध्ये  काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे, श्री.कडू यांचे निर्देश.

·      पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे याबाबत जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, बांधकाम मंत्री  श्री.अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री श्री.धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री श्री. संदिपानराव भुमरे, आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे, महसूल राज्यमंत्री श्री.अब्दुल सत्तार, नगरविकास राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित. पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला देण्याच्या दृष्टीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या प्रस्तावाचा जलसंपदा विभागाने पंधरा दिवसाच्या आत अभ्यास करुन अहवाल सादर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश.

·      साकोली उपजिल्हा रूग्णालयातील ५० खाटांच्या क्षमतेत वाढ करून १०० खाटांमध्ये रूपांतर करणे व सन २०२०-२१ च्या  अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

·      चंद्रपूरचे पालकमंत्री तथा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठक. या वैद्यकीय महाविद्यालयांचे इमारत बांधकाम गतिने आणि दर्जेदार करण्याबाबत तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रसामुग्री, औषधपुरवठा आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीविषयी आरोग्य विभाग,एचएससीसी, वैद्यकीय शिक्षण विभाग, हाफकीन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची विधानभवनात संयुक्त बैठक आयोजित करण्याचे श्री.देशमुख यांचे निर्देश.

·      सांगली जिल्ह्यातील तासगाव, रायगड जिल्ह्यातील खानलोशी, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एमआयडीसीबाबत राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक. आवश्यक तेथे भूसंपादन करून  एमआयडीसी बाबतची आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करून प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश.

·      कृषीमंत्री श्री.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी क्षेत्रात कर्जपुरवठा अधिक होण्यासाठी बँकांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक. कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे बँकांनी येत्या खरिप हंगामासाठी शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर अर्थ सहाय्य करण्याचे श्री. भुसे यांचे आवाहन.

·      उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना धरण जलवाहतूक संदर्भात बैठक, कोयना धरण परिसरातील गावांसाठी दळणवळणाचा मार्ग खुला व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा, पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने कोयना धरण क्षेत्रात जलवाहतूक काळजी घेण्याचे श्री.पवार यांच्याद्वारे स्पष्ट.

·      पैठणच्या संतपीठ अध्यासन केंद्राचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या सूचना.          

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा बैठक. उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे उपस्थित. मुख्यमंत्र्यांचे निर्देश :- रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना नोटीस बजावा, जी कामे सुरू झाली नाहीत अशा कंत्राटदारांना नोटीस देऊन पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून कामाला गती द्या, जलसंधारणाच्या अडचणीसंदर्भात स्वतंत्र समिती गठीत करून पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडावा. याबाबत काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळून बाकी गुन्हे माफ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या.

·      जिल्हा तिथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  स्थापन करण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.अमित देशमुख यांची विधानसभेत माहिती.

·      सारथी  कामकाजात अनियमितता करणाऱ्या दोषींवर कारवाई करणार असल्याची  बहुजन कल्याण मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत माहिती.

·      मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान मोठ्या प्रकल्पांसह रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा, सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता आणि पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई उपस्थित. मुख्यमंत्र्यांचे निर्देश :- उरमोडी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करुन दुष्काळाचा सामना करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचे माणखटाव या भागातील 31 किलोमीटर वितरण प्रणालीचे काम पूर्ण करा, मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करा. पावसाळ्याच्या आधी कार्यारंभ आदेश देवून कामांना प्रत्यक्षात सुरुवात करा,जिल्ह्यातील सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवा, जिल्ह्यातील इतर विकासकामांकरिता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून गरजेनुसार कामांचे प्राधान्यक्रम ठरवा.

·      एकात्मिक राज्य जल आराखड्यात अंतर्भूत योजनांचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी गठीत अभ्यास समितींच्या शिफारशींनुसार मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्यात येईल, अशी जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांची विधान परिषदेत माहिती.

·      अंगणवाडी सेविकांची सहा हजार रिक्त पदे भरणार असल्याची ॲड.यशोमती ठाकूर यांची विधान परिषदेत माहिती.

·      कर्करोग, एच आय व्ही बाधित तसेच दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष उपचार केंद्र पॅलिएटिव्ह केअर सेंटर राज्यात 17 जिल्ह्यात स्थापन, येत्या दोन वर्षात उर्वरित 19 जिल्ह्यात अशी केंद्रे सुरु करण्यात येतील,अशी  सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची विधान परिषदेत माहिती.

·      कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी नसल्याचे  उपमुख्यमंत्री  श्री.अजित पवार यांची विधान परिषदेत माहिती.

·      राज्याला मिळणारा महसूल आणि  वेतन व आस्थापनेवर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण पाहता राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना पुन्हा लागू करता येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांची विधान परिषदेत माहिती

·      राज्यातील सहा जण निरीक्षणाखाली, 149 प्रवासी कोरोना निगेटिव्ह असल्याची आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे यांची माहिती.

·      महिला पोलिसांची संख्या वाढवणार, नवीन बांधकामांना सीसीटीव्ही बंधनकारक करणार असल्याचे गृह मंत्री श्री.अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती,आपत्कालीन परिस्थितीत 112 हा मदत क्रमांक सुरू करणार, आंध्रप्रदेशातील दिशा पोलीस ठाण्यांसारखी खास महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि पोलीस आयुक्तालयाच्या 48 घटकांमध्ये स्वतंत्र विशेष न्यायालये महाराष्ट्रात स्थापन करणार,दिशा कायद्याखाली महिलांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार, सामुहिक बलात्कार, बालकांवरील अत्याचाराचे पोक्सो कायद्याखालील गुन्हे, विनयभंग, ॲसिडहल्ला आदी 5 प्रकारची प्रकरणे चालविण्यात येणार.

·      जे शेतकरी नियमित कर्ज अदा करतात त्यांना दिलासा मिळण्याच्या संदर्भात उपाययोजना आखण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचा सहभाग असलेली मंत्री मंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आल्याची सहाकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांची माहिती. शेतमाल विकण्यासाठी  मार्केट कमिटीत निवडणुकांचा खर्च टाळून कार्यप्रणाली पूर्वीप्रमाणेच सुरू राहण्यासाठी प्रयत्न, राज्यातील सर्व कापूस विकत घेणार, बारदाण्याचा प्रश्न ज्यूट इंडस्ट्रीच्या माध्यमातून सोडवणार.

·      लोकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी शासनाचे विविध निर्णय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील निवासस्थानी येत्या 2 वर्षात स्मारक उभारण्याची गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांची विधान सभेत माहिती. महत्वाचे निर्णय- मुंबईतील म्हाडा इमारतींच्या गच्चीवर पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी इमारतीवर शेड बांधण्यास परवानगी, सुमारे 30 हजार घरांच्या निर्मितीच्या प्रकल्पास येत्या 1 मे च्या आत सुरुवात, पुढच्या दोन वर्षात ही घरे मुंबईत उपलब्ध, एसईझेडसाठी घेण्यात आलेल्या, परंतु  त्या प्रयोजनासाठी वापरण्यात न आलेल्या जागा परत घेऊन त्या ठिकाणी परवडणारी घरे बांधण्याचा विचार, एसआरए इमारतीमध्येच एका छताखाली सेंट्रल एजन्सी तयार करून त्याला 30 दिवसाच्या आत मान्यता देणार.

००००

दि. 4 मार्च, 2020

·      कोरोनाचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही, कोरोनामुळे मृत्युचे प्रमाण केवळ अडीच टक्के असल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची विधानपरिषदेत माहिती. महत्वाचे मुद्दे :- महाराष्ट्रातील विमानतळ व सर्व  बंदरांवर तपासणी, मुंबई येथे कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा, केंद्र शासनाच्यावतीने डॉक्टरांना प्रशिक्षण, राज्यात पर्सनल प्रोटेक्शन कीट, एन-95 मास्क, ट्रीपल लेअर मास्क ही आवश्यक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध, या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांची जाणीवजागृती करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोहीम.

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाऊचा धक्का ते मांडवा रो – पॅक्स फेरी सेवेसंदर्भात बैठक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश :- मांडवा जेट्टी येथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करा, मांडवा येथील जेट्टीजवळील अतिक्रमण दूर करा, वाहनतळाचा विस्तार करा, स्वच्छतागृहे व प्रथमोपचार आदी सुविधा उपलब्ध करून द्या, भाऊचा धक्का ते मांडवा रो – पॅक्स  फेरी सेवा पावसाळ्यात सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करा. मांडवा ते अलिबाग रस्त्याच्या रुंदिकरण कामास गती द्या. 

·      जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लावंघर उपसा सिंचन योजनेसंदर्भात भूसंपादन, न्यायालयीन अडीअडचणी, पाण्याची आवश्यकता व बचत याबाबत बैठक, सातारा तालुक्यातील उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या लावंघर उपसा सिंचन योजनेस तत्वत: मान्यता देण्यात आली असून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे श्री. पाटील यांचे निर्देश. 

·      खामगाव -जालना रेल्वेमार्गासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची विधानसभेत माहिती.

·      राज्यातील ग्रंथालयांसाठी पुढील अधिवेशनात नवे धोरण सादर करण्याची  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी विधानसभेत घोषणा.

·      चिमूर येथे आरटीओ कॅम्प सुरू करणार असल्याची परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची विधानसभेत माहिती.

·      मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता मराठवाडा वॉटरग्रीड ही योजना महत्वपूर्ण आहे. कुठल्याही योजनेचे परिणाम दूरगामी व लोकांच्या फायद्यासाठी असल्यास शासन त्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे विधानसभेत प्रतिपादन.

·      शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  श्री. गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती.

·      महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान, श्रीमती तेजस्व‍िनी सोनवणे, श्री. सागर कांबळे, श्री. रतनकृष्ण साहा, श्री. दिनेश पांड्या सन्मानित.

·      कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागातील गुण नियंत्रणासंदर्भात आढावा बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश :- खते, कीटकनाशके आणि बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या, शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांचा पुरवठा झाल्यास त्यांना कंपनीकडून नुकसानभरपाई देण्याबाबत कायद्याचे प्रारूप तातडीने तयार करा, कंपन्यांनी विक्रेत्यांकडे विक्रीसाठी दिलेली कीटकनाशके किंवा खते कालबाह्य झाल्यास ती कोणत्या पद्धतीने नष्ट केली जावीत, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करा, बियाणे, किटकनाशकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करा.

·      होळी उत्सवात रासायनिक रंगांमुळे होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन नागरिकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवाहन.  

·      उत्तेजीत द्रव्य विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासन कायदा करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री श्री. राजेंद्र शिंगणे यांची विधानसभेत माहिती.

·      अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणार असल्याचे  नगर विकास राज्यमंत्री  श्री. प्राजक्त तनपुरे यांची विधानसभेत माहिती.

·      कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली, सन 2019 मधील खरीप हंगामातील झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक, मंत्री महोदयांचे निर्देश :- हवामानावर आधारित चिकू बागेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी योजना राबवा, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी काजू प्रक्रिया उद्योग उभारा, शेतकरी केंद्रभूत ठेवून योजना राबवा, विमा संदर्भात शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम द्या.

·      पुण्याची भिडेवाडा शाळा, राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करणार असल्याची नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत माहिती.

·      ठाणे जिल्ह्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 269 चौ. फुटांएवजी आता 300 चौ.फुटाचे घर देणार असल्याची, गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांची विधान परिषदेत घोषणा.

·      नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामाबाबत जिल्हाधिकारी ठाणे व रायगड यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्याची कार्यवाही सुरु असून हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी  नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती.

·      म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये सहभागी असलेल्या ज्या विकासकांकडे थकबाकी आहे त्या सर्व थकबाकीदार विकासकांविरुद्ध एफ आय आर दाखल करणार असल्याची, गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांची विधान परिषदेत माहिती.

·      शिवस्मारकाच्या निविदेसाठी कॅगच्या आक्षेपांची चौकशी करुन पुढील निर्णय घेतले जातील, अशी  सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांची विधानपरिषदेत माहिती.

·      एससी-एसटी शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे बहुजन विकास मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत माहिती.

·      महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन.

·      महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून विधानपरिषदेचे सभापती श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत सर्व महिला आमदारांची विधानभवनात बैठक. आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्या तसेच महिला अत्याचारविषयक इतर कायद्यातील तरतुदींची माहिती देण्यात आली. राज्यात करण्यात येणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने महिला आमदारांच्या सूचना जाणून घेतल्या. महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री श्री. सतेज पाटील, श्री. शंभूराज देसाई उपस्थित.

००००

दि. 5 मार्च, 2020

·         महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित, या निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 6 मार्चपासून विधानभवनात 24 तास नियंत्रण कक्ष.

·         महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाख 23 हजारांची मदत, मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द.

·         उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडून विधानसभेत ‘2019-20 ची आर्थिक पाहणी सादर,  राज्य अर्थव्यवस्थेत 5.7 टक्के तर, देशाच्या अर्थव्यवस्थेत 5.0 टक्के वाढ अपेक्षित;  कृषि व संलग्न कार्ये’,  उद्योग  सेवा क्षेत्रात अनुक्रमे 3.1 टक्के, 3.3 टक्के व 7.6 टक्के वाढ अपेक्षित.

·         कोकणचा विकास करतानाच त्याचे समृद्ध वैभव जोपासण्याची ग्वाही देत एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी रोखण्याकरिता राज्याचा कायदा लवकरात लवकर करण्यात येईल, सिंधुरत्न योजना सुरु करतानाच चिपी विमानतळावरुन 1 मे रोजी विमान उड्डाण सुरु करण्यात येईल, जलदुर्गाची सफर घडविणारी योजना सुरु करण्यात येईल अशी, मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची विधानसभेत माहिती.

·         धोरण निश्चितीनंतर नवीन जिल्हा निर्मितीचा निर्णय घेण्याची महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत माहिती.

·         तालुकास्तरावर डायलिसीस उपचार पद्धती सुरू करणार,पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यांचा समावेश करण्याची आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांची विधानपरिषदेत माहिती.

·         प्राध्यापकांच्या वेतनप्रश्नी विधी व न्याय आणि वित्त विभागाशी चर्चेअंती कार्यवाही करणार असल्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती.

·         राज्यातील 21 नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव निती आयोगाकडे पाठविण्यात आल्याची पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची विधानपरिषदेत माहिती.

·         राज्यातील बेकायदा पॅथॅलॅाजींविरोधात कठोर कारवाई  करणार असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांची माहिती.

·         सदोष वीज मीटरमुळे ग्राहकांवर बिलाचा भुर्दंड पडणार नाही , याची ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची विधानसभेत माहिती.

·         पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास संकुल उभारणार असल्याची आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांची विधानसभेत घोषणा.

·          सारंगवाडी साठवण तलावासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्यात मोबदला देणार असल्याची महसूल राज्यमंत्री श्री.अब्दुल सत्तार यांची विधानसभेत माहिती.

·         वित्तीय सेवा आणि गुंतवणूक क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित ब्लॅकस्टोन कंपनीचे अध्यक्ष स्टीफन श्वार्झमन यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाची  मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची भेट.  ब्लॅकस्टोन कंपनीने राज्यात जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचे श्री. ठाकरे यांचे आवाहन.

·         अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्याची  गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांची विधानपरिषदेत घोषणा.

·         रायगड जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहाराची आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांची विधानपरिषदेत घोषणा.

·         कल्याण बाजारपेठ येथे नवीन पोलीस स्टेशन बांधणार असल्याची  गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांची विधानपरिषदेत माहिती.

·         मासेमारी बंदच्या कालावधीत बचत व सवलत योजनेचा लाभ देण्याची  मत्स्यव्यवसाय विकास मंत्री श्री. अस्लम शेख यांची विधानपरिषदेत घोषणा.

·          रासायनिक कारखान्यांची तपासणी करणार असल्याची  कामगार मंत्री श्री.  दिलीप वळसे पाटील यांची विधानपरिषदेत माहिती.

·         राज्यातील होमगार्डचे प्रश्न मार्गी लावण्याची गृह राज्यमंत्री श्री.  सतेज पाटील यांची विधानपरिषदेत माहिती.

·         समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची शिफारस  सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची विधानपरिषदेत माहिती.

·         कोरोना प्रतिबंधाबाबत मुख्य सचिवांकडून आढावा, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद.

·         महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिध्द केल्यानंतर ५ दिवसात १५ लाख 45 हजार शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण पूर्ण, यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा, ही रक्कम रुपये 9035 कोटी आहे.  योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शक पध्दतीने शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिध्द, शेतकऱ्यांना आपल्या नावाचा समावेश यादीमध्ये असल्याबाबतची खात्री, सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने यादी प्रसिध्दीकरण आणि आधार प्रमाणिकरण विनाखंड व विनातक्रार पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन.

·         मंत्रालय परिसरात अत्याधुनिक दर्जाच्या स्वच्छतागृहांचा आराखडा सादर करण्याचे पालकमंत्री             श्री. अस्लम शेख यांचे निर्देश.

·         राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन;अध्यक्षपदी न्या. श्रीहरी डावरे यांची नियुक्ती.

·         महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या विविध मागण्या संदर्भात मंत्रालयात दुग्धविकास मंत्री श्री. सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. महत्वाचे मुद्दे :- दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार करणार, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागांतर्गत असलेल्या प्रयोगशाळा व अन्न औषध प्रशासन विभागांतर्गत असणाऱ्या प्रयोगशाळा यांच्यामार्फत दुधातील भेसळ तपासून कठोर कारवाई, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भेसळ तपासणी व जनजागृती करणाऱ्या व्हॅन कार्यरत, आरे दूध वितरकांचे विक्री कमिशन वाढ व वाहतूकदारांचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही असा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न.

·         ओव्हल मैदानात फुटबॉलसाठी आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करणार असल्याची  क्रीडा मंत्री    श्री. सुनील केदार यांची घोषणा.

·         पशुसंवर्धन विभागातील विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री श्री.सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश.

·          ग्राहकांना अन्न पदार्थ देतांना ते  स्वच्छ व सुरक्षित राहतील याची दक्षता प्रत्येक छोट्या आणि मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घ्यावी आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे यासाठी सुरक्षित अन्न शहर अभियान राबवण्याचा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा निर्णय.

·         वनहक्क कायदा व सामूहिक वन संरक्षण तसेच वनाधारित उपयोगिता यांच्या अंमलबजावणीसंदर्भात विधान भवन येथे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

·         प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून अहवाल सादर करण्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची सूचना.

·         सोलापूर आणि रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उपलब्ध संसाधनांचा वापर करून पुढील शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी महविद्यालय सुरू करण्यासंदर्भात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक.

·         कोरोनापादुर्भाव संदर्भात मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद :- महत्वाचे मुद्दे :- चीनमधील घातक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात झालेला नाही,  राज्यात एकही संशयीत रुग्ण आढळलेला नसून नागरिकांनी भीती न बाळगता सतर्कता ठेवावी, नागरिकांनी मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये, कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे सोय, आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची तपासणी,  त्यासाठी आवश्यक वाढीव डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय विमान आल्यानंतर त्याची साफसफाई करताना कर्मचाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश.पुढील १० ते १५ दिवस अधिक सतर्कता बाळगावी, सार्वजनिक होळीच्या सणाचा आनंद घेताना त्याचे स्वरूप मर्यादीत ठेवा, हातरुमालाचा वापर करा, शिंकताना व खोकताना रुमालाचा वापर करावा.

·         महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करणार असल्याची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेत घोषणा.

·         विविध पुरोगामी राजकीय पक्ष, संघटना आणि संस्था यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या रिपब्लिकन जनआंदोलन या सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची भेट.

·         औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याबाबत मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांची विधानसभेत निवेदन.

·         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंर्तगत होणाऱ्या पदभरतीत पारदर्शकतेने कार्यवाही करत पदभरती संदर्भातील नियमावली तपासून पदभरती करावी, असे बहुजन कल्याण मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांचे निर्देश.

·         सीएए, एनपीआर व एनआरसी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली ६ मंत्र्यांची समिती नेमण्यात येत असल्याची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची विधानसभेत घोषणा, या समितीमध्ये मंत्री सर्वश्री श्री. जितेंद्र आव्हाड, श्री. विजय वडेट्टीवार, श्री. सुनील केदार, श्री. नवाब मलिक आणि श्री. उदय सामंत या मंत्र्यांचा समावेश.

·         महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील दिशा कायदा‘, विधीमंडळाच्या याच अधिवेशनात करण्याची  गृह मंत्री         श्री. अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती.

·         मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्याकरिता १०७ तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना  ८० टक्के अनुदान तसेच इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची, कृषीमंत्री श्री.  दादाजी भुसे यांची विधानसभेत माहिती.

·         राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत घेण्यात येत असलेल्या ज्या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा प्राप्त नव्हता अशा बी.एस्सी. (कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदवी) आणि एम.एस्सी (कृषी)  अंतर्गतच्या १० अभ्यासक्रमांना,  व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची, कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे यांची विधानसभेत माहिती. २ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती/शिष्यवृत्ती.

·         महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची समिती नेमून दर महिन्याला रस्ते विकासाच्या कामाचा आढावा घेण्याचा, मुख्यमंत्री श्री . उद्धव ठाकरे व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) श्री. अशोक चव्हाण, उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम)  श्री. एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे,   श्री. संजय बनसोडे उपस्थित.

·         मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासंदर्भात पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थीनींना शारिरीक शिक्षणाच्या एका तासात हे प्रशिक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत असल्याची शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची विधानसभेत माहिती.

००००

दि. 6 मार्च, 2020

– 2020-21 वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यामार्फत विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यामार्फत विधानपरिषदेत सादर. महत्वाचे मुद्दे- 2019-20 मध्ये 15 हजार कोटी आणि 2020-21मध्ये 7 हजार कोटी अशी तरतूद . 13 लाख 88 हजार 854 शेतकऱ्यांच्या खात्यांवर 9 हजार 35 कोटी  रुपयांची रक्कम यापूर्वी अदा. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरही खरीप हंगाम संपण्यापूर्वी रक्कम वर्ग करणार. शेतकऱ्यांनी 2015-16 ते 2018-19 या कालावधीत घेतलेले व दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत खात्यावरील मुद्दल व व्याज दोन लाख रुपयांहून अधिक नाही अशी थकीत व परतफेड न झालेली रक्कम माफ. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधील घेतलेल्या पीक कर्ज, पुनर्गठित केलेले कर्ज यांचे मुद्दल व व्याजासह दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना. या योजनेनुसार दोन लाख रुपयांवरील त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम बँकेत जमा केल्यावर शासनामार्फत दोन लाख रुपये शेतकऱ्यांना अदा करणार. 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षात घेतलेल्या पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांना देणार. 2018-19 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णता: परतफेड केलेल्या पीक कर्जाची रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना 2018-19 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या पीक कर्जाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देणार. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पुढील 5 वर्षात दरवर्षी 1 लाख याप्रमाणे एकूण 5 लाख सौर कृषी पंप बसवणार. या योजनेसाठी 2020-21 या वर्षासाठी 670 कोटी रुपये निधी प्रस्तावित. शिवभोजन थाळी योजनेसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद.हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग योजनेच्या आर्थिक संरचनेत बदल. या प्रकल्पासाठी शासनामार्फत 8 हजार 500 कोटी रुपये उपलब्ध्‍ा करुन देण्यात आल्यामुळे व्याजावरील रक्कमेमध्ये बचत. या महामार्गावर येत्या वर्षात 4 कृषी समृद्धी केंद्रे उभारणार.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेसाठी 2020-21 मध्ये इमारत बांधणीकरिता 150 कोटी रुपयांची तरतूद. सुमारे 8 हजार  जलसंधारण योजनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना . या योजनेमुळे विकेंद्रित जलसाठे निर्माण होण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ होणार. या योजनेसाठी 450 कोटी रुपयांची तरतूद. अपूर्ण सिंचन प्रकल्प कालबध्द कार्यक्रमाद्वारे पूर्ण करण्यासाठी सुमारे 10 हजार 235 कोटी रुपयांची तरतूद. महिला व बालकांसाठी  प्रथमच महिला व बालकांसाठी लिंगभाव व बाल (जेंडर अॅण्ड चाईल्ड बजेट) अर्थसंकल्प सादर करणार. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर महिला आयोगाचे कार्यालय. प्रत्येक जिल्ह्यात सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असणाऱ्या किमान एका महिला पोलीस ठाण्याची स्थापना. महाराष्ट्र राज्याचा हिरक महोत्सव साजरा करण्यासाठी 55 कोटी रुपयांची तरतूद.नदी कृती आराखडा तयार करण्याबरोबरच पर्यावरण विभागासाठी 230 कोटी आणि विभागाकरिता 1 हजार 630 कोटी रुपयांची तरतूद. मुंबईतील विविध पर्यटन कामांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद. वरळी येथील दुग्धशाळेत आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन संकुल उभारण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद.नांदेड येथील माहूरगड, बीडमधील परळी वैजनाथ, हिंगोलीतील औंढा नागनाथ, जि.हिंगोली, हिंगोलीतील नर्सी नामदेव, परभणीतील पाथरी, अंबरनाथ येथील शिव मंदिर, मिरज येथील हजरत ख्वाजा शमनामिरा दर्गा या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता निधी. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या नावे अध्यासन. राज्यात 75 नवीन डायलेसिस केंद्रे स्थापन करणार. 102 क्रमांकाच्या जुन्या रूग्णवाहिका बदलून यावर्षी नवीन 500 रूग्णवाहिका खरेदी. सार्वजनिक आरोग्यसेवेकरिता 2 हजार 456 कोटी रुपये आणि वैद्यकीय शिक्षणासाठी 950 कोटी रुपयांची तरतूद. नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 2020-21 व सातारा, अलिबाग व अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये 2021-22 या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचे नियोजन. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत प्राधिकृत रूग्णालयांची संख्या 493 वरून 1000. पॅलिएटीव्ह केअरसंबंधी नवीन धोरण. सातारा येथील पाटण येथील ग्रामीण रूग्णालय व भंडारा येथील साकोली येथे उपजिल्हा रूग्णालयाचे 100 खाटांच्या रूग्णालयामध्ये रूपांतर. शिक्षण आणि क्रीडा -प्रत्येक तालुक्यात किमान 4 अशा एकूण 1500 शाळांना आदर्श शाळांचा विकास. तालुका क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये तर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 कोटी रुपयांवरून 25 कोटी रुपये आणि विभागीय संकुलाची अनुदान मर्यादा 24 कोटीं रुपयांवरून 50 कोटी रुपये वाढवणार. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठ.  शिक्षण विभागासाठी 2 हजार 525 कोटी रुपये तर उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1 हजार 300 कोटीं रुपयांची तरतूद. रोजगार-स्वंयरोजगार- किमान दहावी उत्तीर्ण झालेल्यांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना. या योजनेअंतर्गत 5 वर्षात 21 ते 28 वयोगटातील 10 लाख सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण. या योजनेसाठी आगामी 5 वर्षात एकूण 6 हजार कोटीं रुपयांची तरतूद. सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जात वाढ करुन आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रात रुपांतर. स्थानिकांना रोजगारांसाठी आरक्षण कायदा करणार. रस्ते विकास-  ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात 40 हजार किमी रस्त्यांचे बांधकाम. नागरी सडक योजनेसाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी. इतर तरतुदी कोकण विभागात काजूफळ पिकावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना.27 अश्वशक्तीच्यावरील यंत्रमागधारकांना प्रती युनिट विजेच्या अनुदानात 75 पैसे वाढ. कोकण सागरी महामार्गास तीन वर्षात मूर्त स्वरूप देण्यासाठी 3500 कोटीं रुपयांची तरतूद. पुणे शहरात बाहेरून येणारी वाहतूक शहराबाहेरून वळविण्यासाठी 170 किमीचा रिंग रोड. पुणे, पिंपरी चिंचवड मेट्रोअंतर्गत शिवाजीनगर ते शेवाळेवाडी, मान ते पिरंगुट या नवीन मार्गिका, वनाज ते रामवाडी या मेट्रोचा विस्तार चांदणी चौक-वनाज-रामवाडी-वाघोलीपर्यंत विस्तार. मेट्रोसाठी 1 हजार 657 कोटींची तरतूद. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस ताफ्यातील जुन्या बस बदलून आरामदायी व सुविधादायक नवीन 1600 बस विकत घेण्यासाठी  आणि बस स्थानके अत्याधुनिक करण्यासाठी 401 कोटी रुपयाची तरतूद.दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या धर्तीवर बेंगळुरू-मुंबई आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत सातारा जिल्ह्यात 4 हजार कोटी खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करणार. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी 200 कोटी रुपये निधी प्रस्तावित.जल जीवन मिशनसाठी  1 हजार 230 कोटी रुपये आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास 2 हजार 42 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित. मुंबई येथे मराठी भाषा भवन  नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार. पुणे येथे नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी 1000 निवासी क्षमतेचे वसतिगृह. मुंबई व पुणे विद्यापिठात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी 500 निवासी क्षमतेची वसतिगृहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकरिता 2020-21 करिता रुपये 9 हजार 668 कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित.लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळास निधी उपलब्ध करुन देणार.  तृतीयपंथीयांचे हक्काचे संरक्षण आणि कल्याणासाठी मंडळ. आदिवासी विकास विभागासाठी 2020-21 करिता 8 हजार 853 कोटी रुपयांची तरतूद  अल्पसंख्यांक विभागासाठी 2020-21 करिता रुपये 550 कोटी रुपयांची तरतूद. हज यात्रेकरुंच्या सुविधेसाठी ठाणे जिल्ह्यांत मुंब्रा कळवा येथे हज हाऊस.इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागासाठी 2020-21 करिता 3 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित. वार्षिक योजना 2020-21 करिता रुपये 1 लक्ष 15 हजार कोटी निधी प्रस्तावित. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी रुपये 9 हजार 668 कोटी नियतव्यय. आदिवासी विकास उपयोजनेसाठी रुपये 8 हजार 853 कोटी नियतव्यय प्रस्तावित.मुद्रांक शुल्क सवलत – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र आणि पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपुर या महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीच्यावेळी भराव्या लागणाऱ्या एकंदरीत मुद्रांक शुल्क व इतर निगडीत भारामध्ये पुढील दोन वर्षांच्या कालावधीकरिता 1 टक्के सवलत.वीज शुल्क सवलत – औद्योगिक वापरावरील वीज शुल्क सध्याच्या 9.3 टक्क्यावरून 7.5 टक्के करणार.

 अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया-

कृषीमंत्री दादाजी भुसे  कृषी क्षेत्राला चालना देतानाच शेतकरी चिंतामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल. आरोग्यमंत्री राजेश टोपे-  ग्रामीण आरोग्य यंत्रणेला सक्षम करणारा अर्थसंकल्प. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख  मुख्यमंत्री जलसंवर्धन या नवीन योजनेमुळे राज्यातील जलसाठ्यात होणार वाढ होणार. वनमंत्री संजय राठोड – समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार- क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा प्राप्त होणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण -यंदाचा अर्थसंकल्प राज्याला नवी दिशा आणि विकासाला चालना देणारा. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सहकार चळवळीला बळकट करणारा अर्थसंकल्प. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत – सौर कृषीपंपाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत- विद्यार्थ्यांचा भविष्यवेध घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद. उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे-  कोकणाच्या विकासाला प्राधान्य देणारा, सर्वांच्या हिताचा अर्थसंकल्प. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा सन्मान करणारा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील- राज्याच्या सर्व विभागांना यथोचित न्याय देणारा अर्थसंकल्प. ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ- ग्रामीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प. अन्न,नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ- मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दिशा देणारा अर्थसंकल्प. बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार- बेरोजगारांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांना समाधान देणारा अर्थसंकल्प. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील- शेतकरी व गोरगरीब जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प. परिवहन मंत्री अॅड.अनिल परब लोकाभिमुख शासनाचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प. पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प.कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक -तरुणांचा कौशल्य विकास, अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण याबरोबरच राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प.गृह (शहरे), परिवहन व गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील – शेतकऱ्यांना दिलासा, प्रवाशांना सुविधा व महिलांना सुरक्षा  प्रदान करणारा अर्थसंकल्प. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात – सर्व समाजघटकांना न्याय देणारा, सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मत्रांलयातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या वतिने त्यांचे शुभेच्छा पत्र आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत.

– कोरोना विषाणू कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत विविध राज्यांमध्ये सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांचा सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. महाराष्ट्रात कोरोनाचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे प्रयोगशाळा सुरु करण्याची आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांची मागणी.

– प्रकल्पग्रस्त शेतकरी कै. धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना जमिनीचा उचित मोबदला देण्यात यावा. यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन झालेल्या नुकसानीबाबत अधिक मदत करण्यात यावी, अशा विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना.

-विधानसभा अध्यक्ष श्री नाना पटोले  यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हयातील साकोली, लाखांदूर व लाखणी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजना, आरोग्य विभांगांर्तगत रूग्णवाहिका वाहन चालकांना राज्यस्तरावर समायोजन करणे, तसेच इतर समस्यांबाबत आढावा बैठक.

– विधी व न्याय विभाग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक.

– जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्पोरेट क्षेत्रातील 30 नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. माता व बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये खासगी उद्योग (कॉर्पोरेट) क्षेत्राने सहयोग देण्याचे शासनाला जाहीर अभिवचन. कार्यक्रमात पोषण पंधरवड्याचा शुभारंभ, ‘यशोदा माता अंगत पंगत योजनेचा शुभारंभ तसेच पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा सत्कार.

– पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते माहुलमधील प्रदूषणग्रस्त भागातील कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप.

– केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्यावतीने राजधानीत आयोजित दिव्यांग उद्योजकांच्या एकम फेस्ट प्रदर्शनीत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील उद्योजकांना दिल्लीकर तसेच देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद.

दि. ७ मार्च २०२०

– शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ,महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय मुंबई अंतर्गत तनिष्का लोकसंचालित साधन केंद्र, धारावी येथे जिल्हा नियोजन समिती यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून सुरू करण्यात आलेल्या तनिष्का गारमेंट युनिट व तेजस्विनी फॅशनचे उद्घाटन.

  – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी  संचालिका (डिरेक्टर ऑफ पार्टनरशिप) लॉरेन मार्कल यांच्यासोबत भेट. भारत व अमेरिके दरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढविण्यावर यावेळी चर्चा. नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात न्यूयॉर्कने महाराष्ट्रात गुंतवणूक केल्यास राज्य शासनाचे सहकार्य  देण्याची  श्री. देसाई यांची ग्वाही .

                                       ****

Most Popular

To Top