मेष प्रतिष्ठा वाढेल
महत्त्वाची कामे या आठवड्यात पूर्ण होतील. भेट व चर्चा सफल होईल. क्षेत्र कोणतेही असो तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. नोकरीत कामाचा व्याप असला तरी अधिकार वाढण्याची शक्यता आहे. चित्रपट, कला, क्रीडा क्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. शुभ दिनांक – ७ , ८
वृषभ वर्चस्व वाढेल
कोणत्या कामाला अधिक महत्त्व द्यावयाचे ते ठरवा. राजकीय क्षेत्रात वाद झाला तरी तुमचे वर्चस्व राहील. प्रामाणिक कार्य झाले असेल तर चांगले यश पदरात पडेल. व्यवसायात मोठे कंत्राट मिळू शकेल. नोकरीतील तणाव व समस्या मिटवा. प्रगतीची महत्त्वाची संधी मिळेल. शुभ दिनांक – ८, ९.
मिथुन महत्त्वाचे निर्णय घ्याल
आठवडा उत्साहवर्धक राहील. नोकरी – धंद्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा व पद मिळण्याचा योग येईल. दर्जेदार परिचय होतील. चित्रपट, कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक होईल. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. शुभदिनांक – ८, ९.
कर्क मनाविरुद्ध घटना घडतील
कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. त्यांच्याबरोबर तणाव होण्याचा संभव आहे. राजकीय क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडेल. वरिष्ठांची नाराजी होईल. कठीण प्रसंगावर मात करू शकाल. कोर्ट केसमध्ये समस्या वाढण्याची शक्यता आहे. शुभ दिनांक – ९, १०
सिंह निर्णय घेताना सावधानता
नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. धंद्यासाठी संधी समोरून येईल. करार करण्याची मात्र घाई नको. भावनेच्या भरात कोणतेही भलतेच आश्वासन देऊ नका. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबातील लोकांना वेळ द्यावा. कोर्ट केसमध्ये यश लाभेल.
शुभ दिनांक – ७, ११
कन्या जबाबदारी वाढेल
राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर जबाबदारी वाढेल. तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. कोर्ट केसमध्ये सावध भूमिका घ्या. गुप्त कारवायांचा त्रास होईल. भावनेच्या आहारी जाऊन कोणालाही मदत करू नका. व्यवसायात नवीन संधी येईल. शुभ दिनांक– ६, ७
तूळ मतभेद होतील
सर्वच क्षेत्रातील महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. रविवार किरकोळ तणाव कुटुंबात होईल. योग्य सल्ला घ्या. जीवनसाथीच्या समवेत किरकोळ मतभेद होतील. प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात मेहनत घ्यावी. काळजी घ्यावी. शुभ दिनांक – ७ , ९
वृश्चिक ताणतणाव वाढेल
तुमच्या बुद्धीनुसार तुम्ही सर्व बाजूने राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रयत्न केले, परंतु त्या पद्धतीने मोठे यश मिळाले नाही याची खंत वाटेल. ताणतणाव वाढेल. सर्वांच्या मतानुसार निर्णयात बदल करण्याची वेळ येऊ शकते. शब्द जपून वापरा. विद्यार्थ्यांनी नम्रता ठेवणे उपयुक्त ठरेल. शुभ दिनांक – ९, १०
धनु गैरसमज होतील
कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न निकाली निघेल. व्यवसायात करार करताना भावनेच्या जोडीला व्यवहारिक बाजू मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. दगदग वाढेल. गैरसमज होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कला, क्रीडा क्षेत्रात भारी प्रतिस्पर्धी असला तरी तुमची जित होईल. शुभ दिनांक – ७, ११
मकर अथक प्रयत्नांची गरज
ठरविलेल्या कार्यक्रमात या आठवड्यात बदल करण्याची वेळ येईल. मन अस्थिर राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणत्या मार्गाने प्रगती करावी, असे अनेक प्रश्न निर्माण होतील. कोर्ट केसमध्ये मदत मिळेल तरीही स्वतः सावध रहा. क्रीडा, कला क्षेत्रात नावलौकिक मिळेल. शुभ दिनांक – ५, ७
कुंभ आत्मविश्वास वाढेल
तुमचा या आठवड्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता दुसऱ्याला मोठेपणा देण्याचा तुमचा स्वभाव आहे. तुमचा मित्रपरिवार दर्जेदार व व्यापक स्वरूपाचा होईल. व्यवसायात मोठी संधी मिळेल. शुभ दिनांक – ६, ७
मीन चर्चा सफल होतील
आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची चर्चा सफल होऊ शकेल. क्षेत्र कोणतेही असो तुम्ही वेळ, प्रसंग पाहून निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न होईल. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही कृत्य कायद्याच्या विरोधात जाऊन करू नका. शुभ दिनांक – ६, ९
