यंदाचे आर्थिक वर्ष संपायला अवघे काही आठवडे शिल्लक असले तरी राज्याच्या विकासासाठी मागीलवर्षी तरतूद करण्यात आलेला निम्मा निधी अद्यापही वापराविनाच पडून असल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस सरकारने २०१६-१७च्या अर्थसंकल्पात राज्यातील विकासकामांसाठी ८९, ७७८ कोटी इतक्या रकमेची तरतूद केली होती. मात्र, आता आर्थिक वर्ष संपायला साधारण पंधरवडा शिल्लक असताना यापैकी ४६, ८०९ कोटींचा निधी वापरलाच गेला नसल्याचे उघड झाले आहे. टक्केवारीत मोजायचे झाल्यास हा आकडा ५२ टक्के इतका आहे. राज्याच्या अर्थमंत्रालयाच्या संकेतस्थळावर ही माहिती नमूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पानुसार विकास आणि नवीन संपत्तीच्या निर्मितीसाठी हा निधी खर्च करण्याचे ठरले होते. यामध्ये केवळ भांडवली खर्चाचा समावेश होता. वेतन, कर्जफेड , निवृत्तीवेतन आणि अन्य दैनंदिन खर्चाचा या निधीत समावेश होता.
By
Posted on