By
Posted on
महासत्ता: नागपूर
शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून कृषी अधिकाऱ्यांनीच हरभऱ्याचे बियाणे हडपल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघड झाला. एक-दोन नव्हे तर तब्बल 500 शेतकऱ्यांसाठी आणलेलं 14 हजार किलो बियाणे हडप करत करताना या कृषी अधिकाऱ्यांनी काही मृत शेतकऱ्यांना लाभार्थी दाखवलं.
त्यामुळे या कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील लोंखरी, नांदा, खापा आणि चिकना या गावांतील 500 शेतकऱ्यांसाठी तब्बल 14 हजार किलो बियाणे आले होते.
मात्र, मृतांच्याही टाळूवरील लोणी खाणाऱ्या या कृषी अधिकाऱ्यांनी 95 टक्के शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे सर्व बियाणं हडप केलं. त्यातून मृत शेतकऱ्यांनाही त्यांनी सोडलं नाही.