महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती


गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात
मुंबई, दि. १७ : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये बंद्यांद्वारे मास्कनिर्मिती करण्यात येत आहे.


अचानक मागणी वाढल्यामुळे राज्यात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह बंद्यांद्वारे मास्कनिर्मिती केल्यास पुरवठ्याचे प्रमाण वाढविता येणे शक्य आहे. याबाबत श्री.देशमुख यांनी मास्कनिर्मितीची कल्पना मांडली. त्याला तुरुंग प्रशासनानेही उत्तम प्रतिसाद देत तात्काळ मास्कनिर्मितीला प्रारंभ केला. हे मास्क बनवून ते स्वतःही तसेच तुरुंग प्रशासनही वापरत आहे. तसेच बाजारातील तुटवडा पाहता विक्रीसाठी पुरवठादारांना देण्यात येत आहेत. बंद्यांनाही त्याचा मोबदला त्यांच्या नावावर जमा केला जातो.

0000

सचिन गाढवे/ वि.सं.अ./दि.१७.३.२०२०

Most Popular

To Top