महाराष्ट्र

नाशिकच्या साहित्य चळवळीचा मार्गदर्शक हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि. 21 : चतुरस्त्र लेखक आणि कवी किशोर पाठक यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य आणि वाचक चळवळीचा मार्गदर्शक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ लेखक, कवी आणि नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक यांच्या निधनाने चतुरस्त्र साहित्यिक आपण गमावला आहे. नाटक, बालसाहित्य, बालकविता, कथा, कविता अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला विशेष ठसा उमटविला आहे. नाशिकमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. साहित्य आणि वाचन चळवळीला गती देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य नाशिककरांच्या कायम स्मरणात राहील.

Most Popular

To Top