महाराष्ट्र

संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू; लोकहितासाठी कठोर निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. २३: जनतेच्या हितासाठी कर्तव्यभावनेने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले.आज मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून हे जाहीर केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.

जिल्ह्यांच्या सीमाही सील

मुख्यमंत्री म्हणाले, देशांतर्गत विमान वाहतूक थांबविण्यासाठी आपण प्रधानमंत्र्यांना विनंती पत्र पाठवले आहे.  आणखी एक पाऊल आज उचलण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या सीमा आपण सील केल्या आहेतच. आता जिल्ह्याच्या सीमाही आपण सील करत आहोत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा अजून प्रादुर्भाव झालेला नाही, तिथे हा विषाणू पोहोचू नये हा त्यामागचा उद्देश  आहे.

अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

 ही वेळ मौजमजा करण्याची नाही तर स्वयंशिस्तीने वागण्याची आहे असे  मुख्यमंत्री म्हणाले. ही बंधने  काही काळासाठी आहेत. जीवनावश्यक वस्तू, औषधे, औषधे निर्माण करणारे कारखाने, दूध, बेकरी,  कृषी उद्योगांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने आणि दवाखाने सुरुच राहणार आहेत. कृषी उद्योगाशी संबंधित वाहतूकही सुरु राहणार आहे.

गर्दी नाही म्हणजे नाहीच

 गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच याचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,  अत्यावश्यक सेवेसाठीच खाजगी वाहने रस्त्यांवर उतरतील.  टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त  अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल.संकट आहे, पण भविष्यात ते आटोक्यात ठेवायचे असेल तर नियम पाळावेच लागतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य व्यवस्थेचा आढावा

आज संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,  आरोग्य व्यवस्थेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

माध्यमांना धन्यवाद

घाबरून जाण्याची नसली तरी काळजी घेण्याची वेळ आहे. सरकार जनजागृती करत आहे. अनेक माध्यमेही काय करावे आणि काय करु नये याची माहिती देऊन सहकार्य करत आहेत. याचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी यासाठी अधिकृत सूत्रांद्वारे येणाऱ्या माहितीचाच उपयोग या कामी केला जावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.  

होम क्वारंटाईन लोकांनी काळजी घ्यावी

परदेशातून आलेल्या आणि ज्यांना होम क्वारंटाईन केले आहे अशा लोकांनी १५ दिवस  समाजाच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वत:ला वेगळे ठेवावे, बाहेर फिरु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायरन वाजला आहे, पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत त्यामुळे सर्वांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे, आतापर्यत सर्वांनी सहकार्य केले आहे. भविष्यात हे सहकार्य कायम ठेवून आपण सर्व मिळून त्यावर मात करु असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Most Popular

To Top