महाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई, दि. 24 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात श्री. सुनील भारद्वाज, पोलिस अधीक्षक तथा सह आयुक्त (दक्षता) यांच्या नियंत्रणात सुरु राहणार आहे.

सध्या जगात, देशात, राज्यात कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत जनतेला सर्व आवश्यक औषधे नियमित उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. औषध वितरण व उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडले जाते. मात्र औषध वितरण नियमित ठेवणे व औषध उत्पादन सुरळीत सुरु ठेवणे यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरणासाठी संबंधितांनी काही अडचणी आल्यास नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १८००२२२३६५ ०२२-२६५९२३६२/६३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Most Popular

To Top